सोशल मीडियावर चांगले, वाईट, मजेशीर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ असतात. पण हा व्हिडीओ जो सुरुवातीला मजेशीर वाटेल पण नंतर मात्र दुःख होईल. हसता हसता तुम्हाला रडायला लावेल. त्यामुळेच हा व्हिडीओ चांगला चर्चेत आला आहे. आता असं या व्हिडीओत काय आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
अजबच आहे राव! 75 वर्षांचे आजोबा, बायकोला सोडून फुग्याच्या प्रेमात, बंद खोलीत रोमान्सही करतात
advertisement
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एका बाईकवर दोन लोक बसले आहेत आणि नंतर त्यांचा तिसरा मित्र येतो आणि कोणालाही उतरवल्याशिवाय मध्यभागी बसतो. यानंतर तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या विनंतीवरून तो पुन्हा उतरतो आणि पुन्हा बसतो. प्रत्येक वेळी तो उतरतो आणि बसतो तेव्हा तो स्वतः आणि त्याचे मित्र हसतात.
आता हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय तर, खरं तर त्या व्यक्तीचा एक पाय नाही. आता हे माहित नाही की त्याने अपघातात एक पाय गमावला आहे की तो लहानपणापासूनच त्याच्याशिवाय आहे, पण त्यासाठी शोक करण्याऐवजी तो आनंदी राहतो आणि म्हणूनच व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ @raman_gahlotofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
अद्भुत! या बेंचवर बसताच दिसतं जगातील सगळ्यात सुंदर दृश्य, कोणतं? Watch Video
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने म्हटलं, देव या भावाला नेहमी आनंदी ठेवो. दुसऱ्या युझरने लिहिलं, भाऊ बाहेरून हसत आहे पण आतून दुःखी असावा. तिसऱ्या युझरने लिहिले, मला एकाच वेळी हसावं आणि रडावंसं वाटतं आहे, चौथ्या युझरने लिहिलं, भाऊ दुःखाला आनंद मानत होता. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.