या कलेक्शनमध्ये गौरींची पावलं, खणाचे व पैठणीच्या कापडाचे हळदीकुंकवाचे ताट, पारंपरिक तोरण, रंगीबेरंगी चौरंग, आसन अशा गोष्टी मिळत आहेत. याशिवाय अनेक आकर्षक सजावटीच्या वस्तू देखील येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे येथील वस्तूंची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
फ्रिज मॅग्नेट्स (लक्ष्मीची प्रतिमा असलेलं) 200 रुपेय, श्री स्वामी समर्थांची स्टँडिंग फ्रेम 220 रुपये, तर गौरींची पावलं 50 ते 300 रुपयांना मिळत आहेत. पारंपरिक सजावटीसाठी उपयुक्त सात वारांची रांगोळी 450 रुपयांना, खणटोपी 500 रुपयांना आणि चौरंग कव्हर 550 रुपयांना मिळत आहे. यामध्ये विविध आकार उपलब्ध आहेत.
सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व साईजमध्ये खास पैठणी जॅकेट्स 550 रुपयांना उपलब्ध आहेत. गणपतीच्या सजावटीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले बॅकड्रॉप्स 300 रुपयांना मिळतात. आधुनिकतेचा छटा असलेली फॅब्रिक ज्वेलरी 600 ते 1200 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. हे बुटीक कल्याणमधील सविता टॉवर्स येथे स्थित असून. ग्राहक दुकानात जाऊन प्रत्यक्ष खरेदी करू शकतात किंवा '8877953020' या क्रमांकावर संपर्क साधून ऑनलाइन ऑर्डरही देऊ शकतात. गणेशोत्सवाच्या पारंपरिक सजावटीसाठी 'आसमहास क्रिएशन्स' हा एक परवडणारा आणि दर्जेदार पर्याय असल्याचं बुटिक ओनर म्हणाल्या.