TRENDING:

Video : जेव्हा एक माकड दुसऱ्या माकडांचा व्हिडीओ पाहातो, रिक्शन अशी की पाहून पोटधरुन हसाल

Last Updated:

या माकडाने जेव्हा माणसाच्या फोनमध्ये रिल्स पाहायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यासमोर सर्वात आधी एका माकडाचा व्हिडीओ होता. त्यानंतर माकड देखील माणसासारखा फोन स्क्रोल करु लागला तो जितकं फोन स्क्रोल करत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. कधीकधी इथे काही व्हिडीओ असे काही व्हायरल होतात की ते एका दिवसात ट्रेंड होऊ लागतात. हे व्हिडीओ कधी माणसांशी संबंधीत असतात तर कधी प्राण्यांशी. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ माकडाशी संबंधीत आहे.
माकडाचा व्हिडीओ
माकडाचा व्हिडीओ
advertisement

या माकडाने जेव्हा माणसाच्या फोनमध्ये रिल्स पाहायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यासमोर सर्वात आधी एका माकडाचा व्हिडीओ होता. त्यानंतर माकड देखील माणसासारखा फोन स्क्रोल करु लागला तो जितकं फोन स्क्रोल करत होता. तितके त्याला माकडांचेच व्हिडीओ दिसत होते आणि तो देखील अगदी माणसासारखं हुबेहुब रिल्स स्क्रोल करत बसला होता आणि त्याला आपले माकड मित्र काय काय करतायत याबद्दल पाहायचं होतं.

advertisement

मोबाईलमध्ये रील पाहणारा माकड इतका हरवून जातो की तो पूर्ण लक्ष देऊन तो स्क्रीनकडे पाहात बसतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उत्सुकता दिसते. इतकंच काय, तर तो आपल्या बोटानं स्क्रीनला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करतो. जणू काही तो त्या दुसऱ्या माकडाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असावा. माकडाचं हे वागणं अगदी माणसासरखंच आहे. जे खरोखर हस्यास्पद आहे.

advertisement

माकडाचा असा निरागसपणा पाहून सोशल मीडियावर काही लोकांना आश्चर्य वाटलं तर काही लोकांना हे अगदी माणसासारखं हुबेहुब जाणवलं. ज्यामुळे लोकांना हसू आवरलं नाही. काही युजर्स म्हणतात, "बाप रे! आता तर माकडीी स्मार्टफोन वापरू लागलेत!" तर दुसरे म्हणाले, "यंदाचा रील स्टार आपल्यासमोर आहे."

43 लाखांहून अधिक व्ह्यूजहा मजेदार व्हिडीओ इंस्टाग्रामवर beautiful._world या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "एक जिज्ञासू माकड फोनमध्ये दुसऱ्या माकडाचा रील पाहतो आणि आश्चर्यचकित होतो. तो स्क्रीनला पाहतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जणू एखादं लहान मूल पहिल्यांदा मोबाईलमध्ये रील पाहतंय."

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Video : जेव्हा एक माकड दुसऱ्या माकडांचा व्हिडीओ पाहातो, रिक्शन अशी की पाहून पोटधरुन हसाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल