TRENDING:

99 वर्षांसाठी प्रॉपर्टी लीजवर घेतात खरं, पण त्याची मुदत संपल्यावर काय होतं, ती कोणाच्या मालकीची होते?

Last Updated:

एग्रिमेंट संपल्यावर कोणाच्या मालकीची होते 99 वर्षांसाठी लीजवर घेतलेली प्रॉपर्टी?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनेकदा जागा किंवा इमारत 99 वर्षासाठी लोकांनी लीजवर दिली आहे. लीज म्हणजेच काय तर भाड्याने ती जागा किंव इमारत भाड्याने दिली जाते. यामध्ये एक प्रकारचं एग्रीमेंट होतं, ज्यामध्ये तुम्ही 99 वर्षासाठी त्या जागेला भाड्याने घेता आणि तिथे तुम्हाला हवं ते करु शकता. अशा मालमत्तेला लीजहोल्ड प्रॉपर्टी म्हणतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण अनेकांना असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, जेव्हा खूप मोठमोठ्या जमीनी जेव्हा 99 वर्षांच्या कालावधीसाठी घेतल्या जातात आणि तिथे बऱ्याच गोष्टी डेवलप झाल्या असतील इतक्या वर्षात आणि मग 99 वर्षांनी जेव्हा तो एग्रिमेंट किंवा ती लीज संपते, तेव्हा त्या जागेचं काय होतं?

ही जागा किंवा इमारत परत घेतली जाईल का? मग त्याच्या मालकाला त्याचा मालकी हक्क सोडावा लागेल का? चल याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

advertisement

देशात जमीन, घर, दुकान आणि फ्लॅटची खरेदी-विक्री लीज होल्ड आणि फ्रीहोल्ड अशा दोन प्रकारे केली जाते. सर्वप्रथम आपण लीजहोल्ड आणि फ्रीहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय हे समजून घेऊया?

वडिलोपार्जित मालमत्ता केवळ फ्रीहोल्ड मालमत्तेद्वारे तयार केली जाते.

फ्रीहोल्ड मालमत्ता ही अशी मालमत्ता आहे ज्यावर खरेदीदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नाही. अशी मालमत्ता आपोआप खरेदीदाराच्या मुलांना आणि नंतर त्यांच्या मुलांना हस्तांतरित केली जाते. दुसऱ्या शब्दांत, वडिलोपार्जित मालमत्ता फ्रीहोल्ड मालमत्तेपासून तयार केली जाते.

advertisement

कुटुंबाबाहेरील व्यक्ती त्यावर हक्क सांगू शकते तरच ती विकली गेली असेल किंवा मृत्यूपत्राद्वारे त्याला दिली जाईल. सोप्या शब्दात, फ्री-होल्ड मालमत्ता खरेदी केल्यानंतर, ती पूर्णपणे खरेदीदाराची असते.

लीजहोल्ड प्रॉपर्टी

देशातील बहुतेक शहरांमध्ये फ्लॅट लीजहोल्ड प्रॉपर्टी म्हणून विकले जात आहेत. हे फ्लॅट्स या कालावधीसाठीच तुमच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही जमिनीचे पट्टे 10 वर्षे, 20 वर्षे, 15 वर्षे किंवा 30 वर्षांसाठी असतात. शॉर्ट टर्म लीजहोल्ड प्रॉपर्टी खरेदी केल्याने बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होते.

advertisement

निश्चित कालावधीनंतर लीजहोल्ड मालमत्ता मूळ मालकाला परत केली जाते. मूळ मालकाची इच्छा असेल तर तो त्याच्या जमिनीवर उभी असलेली संपूर्ण इमारतही पाडू शकतो. अशा परिस्थितीत, लीजहोल्ड मालमत्ता वाचवण्यासाठी, खरेदीदाराला भाडेपट्टी वाढवावी लागते.

लीजहोल्ड मालमत्तेवर हक्क कसे राहतील?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भाडेतत्त्वावर मालमत्ता खरेदी करणाऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. लीजचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो वाढवता येतो. त्याच वेळी, कालावधी पूर्ण होण्यापूर्वी लीजहोल्ड मालमत्तेचे फ्रीहोल्ड मालमत्तेत रूपांतर करून, एखादी व्यक्ती मालमत्तेवर कायमचे मालकी हक्क मिळवू शकते. त्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करून शुल्क भरावे लागेल.

advertisement

ते म्हणाले की, राज्य सरकारे वेळोवेळी लीज होल्ड मालमत्तेचे फ्रीहोल्डमध्ये रूपांतर करण्याच्या योजना आणत असतात. मोठ्या सोसायट्यांच्या बाबतीत हे काम बांधकाम व्यावसायिकांना करावे लागते. यासाठीचे शुल्कही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असते.

मराठी बातम्या/Viral/
99 वर्षांसाठी प्रॉपर्टी लीजवर घेतात खरं, पण त्याची मुदत संपल्यावर काय होतं, ती कोणाच्या मालकीची होते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल