एक तरुण ट्रेनने प्रवास करत असतो. मात्र तो ट्रेनच्या बाहेर स्वतःला झोकून देत स्टंट करतो. हे दृश्य खूपच भयानक आहे. तो स्वतः आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. हा स्टंट व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
चक्क खाटेपासून बनवली 'फोर व्हिलर', हटके जुगाडू Video पाहून व्हाल चकित
advertisement
स्टंट व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणाने एका हाताने ट्रेन पकडली आहे आणि आपलं शरीर पूर्णपणे बाहेर झोकून दिलंय. भरधाव वेगाने ट्रेन असूनही तरुण आपला जीव धोक्यात घालताना दिसतोय. समोर झाड, खांब जे काही येईल त्याला चकमा देताना दिसतो. मात्र त्याचा तोल गेला असता किंवा तो कशाला धडकला असता तर नको ते घडलं असतं आणि हा स्टंट तरुणाच्या अंगलट आला असता.
@swatipathak658 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा स्टंट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदाचा हा जीवघेणा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसतायेत. अनेकांनी अशा स्टंटबाजीवर संताप व्यक्त केलाय.
दरम्यान, अशा अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. स्टंट करताना लोकांसोबत अनेक धक्कादायक घटनाही घडल्याचं समोर आलंय. बऱ्याचदा स्टंट करताना लोकांचा तोल जातो, दुखापत होते. कधीतर लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे अशी स्टंटबाजी करणं खूप धोकादायक असून प्रसिद्धीसाठी असं करणं टाळावं.
