चक्क खाटेपासून बनवली 'फोर व्हिलर', हटके जुगाडू Video पाहून व्हाल चकित

Last Updated:

प्रत्येक क्षेत्रात भारत प्रगती करत आहे. दिवसेंदिवस लोकही स्मार्ट होत चालले असून अनेक नवे संशोधन करत असतात. तुम्हाला एखाद्या गावाच्या गल्लीतही आज नव्या गोष्टींचा अविष्कार करणारे लोक सापडतील.

चक्क खाटेपासून बनवली 'फोर व्हिलर'
चक्क खाटेपासून बनवली 'फोर व्हिलर'
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : प्रत्येक क्षेत्रात भारत प्रगती करत आहे. दिवसेंदिवस लोकही स्मार्ट होत चालले असून अनेक नवे संशोधन करत असतात. तुम्हाला एखाद्या गावाच्या गल्लीतही आज नव्या गोष्टींचा अविष्कार करणारे लोक सापडतील. खास करुन जुगाडू. लोक जुगाड करुन नवनव्या गोष्टी बनवतात. यातील काही कमी खर्चाच्या आणि जास्त कामाच्या गोष्टीही लोक बनवतात. त्यामुळे आपल्या देशात जुगाडूंची काही कमतरता नाही. सोशल मीडियावर जुगांडूंचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक जुगाडू व्यक्तीचा व्हिडीओ समोर आलाय. एका व्यक्तीनं चक्क खाटेची फोर व्हिलर तयार केलीय.
एका व्यक्तीनं जुगाड करुन फोर व्हिलर बनवलीय, याचा व्हिडीओ सध्या इंटनेटवर जोरदार व्हायरल होतोय. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं खाटेपासून ही गाडी बनवलीय. पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, अशी पण गाडी बनवू शकतो. व्यक्तीचा हा जुगाड सध्या चांगलाच चर्चेत आलाय.
समोर आलेल्या जुगाडू व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पेट्रोल पंपवर लोक पेट्रोल भरण्यासाठी आपली गाडी घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात एक खाटेपासून गाडी बनवलेला व्यक्ती तिथे पेट्रोल भरायला येतो. हे पाहूनच लोक थक्क होतात. झोपण्याच्या खाटेपासून या व्यक्तीनं चार चाकी गाडी बनवलीय. त्यानं बनवलेल्या या गाडीत पेट्रोल टाकण्याचीही सोय असून तो निवांत बसून गाडी चालवताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्या असतील.
advertisement
advertisement
झोपण्याच्या खाटेपासून कोणी चार चाकी बनवेल असा विचारही कोणाला आला नसेल. मात्र या व्यक्तीनं चक्क गाडी बनवून दाखवली. त्याचा हा जुगाड पाहून सर्वच चकित झाले. dramebaazchhori99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच व्हायरल झाला. लोक हा व्हिडीओ पाहून निरनिराळ्या कमेंट करत आहेत.
advertisement
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक हटके जुगाडाचे व्हिडीओ समोर येत असतात. आपण विचारही केला नसेल अशा गोष्टी लोक जुगाड करत बनवतात. त्यामुळे जुगाडू लोक कधी कशापासून काय बनवतील काही सांगू शकत नाही. नेहमीच चकित करणारे जुगाडू लोकांचे व्हिडीओ समोर येत असतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
चक्क खाटेपासून बनवली 'फोर व्हिलर', हटके जुगाडू Video पाहून व्हाल चकित
Next Article
advertisement
Sanjay Raut On Uddhav Raj : उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या बैठकीत काय झालं? संजय राऊतांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितली Inside Story
उद्धव -राज यांच्या बैठकीत काय झालं? राऊतांनी सांगितली Inside Story
  • उद्धव -राज यांच्या बैठकीत काय झालं? राऊतांनी सांगितली Inside Story

  • उद्धव -राज यांच्या बैठकीत काय झालं? राऊतांनी सांगितली Inside Story

  • उद्धव -राज यांच्या बैठकीत काय झालं? राऊतांनी सांगितली Inside Story

View All
advertisement