TRENDING:

Viral Video : पठ्ठ्यानं एका वेळी 4 मुलींशी केलं लग्न; लोक म्हणाले, ऊपर वाला देता है तो छप्पर फाडके....

Last Updated:

लग्नसराईचा सीझन सध्या सुरु आहे. अनेक लोक शुभ मुहुर्त शोधून लग्न करत आहेत. सोशल मीडियावरही अनेक लग्नांच्या फोटो, व्हिडीओंची धूम पहायला मिळतेय. लग्नातील विविध प्रकारच्या घटना चर्चेत येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 7 डिसेंबर : लग्नसराईचा सीझन सध्या सुरु आहे. अनेक लोक शुभ मुहुर्त शोधून लग्न करत आहेत. सोशल मीडियावरही अनेक लग्नांच्या फोटो, व्हिडीओंची धूम पहायला मिळतेय. लग्नातील विविध प्रकारच्या घटना चर्चेत येत असतात. सध्या एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एका तरुणानं एक नव्हे तर चक्क चार मुलींसोबत लग्नगाठ बांधली.
पठ्ठ्यानं एका वेळी 4 मुलींशी केलं लग्न
पठ्ठ्यानं एका वेळी 4 मुलींशी केलं लग्न
advertisement

काहींना एका लग्नासाठी मुली मिळत नाहीत या पठ्ठ्यानं एकावेळी चार मुलींसोबत सप्तपती घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती चार मुलींसोबत लग्न करतोय. तरुणाच्या मागोमाग चार मुली सप्तपती घेत आहेत. तरुण व्हिडीओमध्ये मस्त आनंदी, हसताना पहायला मिळतोय. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

advertisement

@darshanvpathak नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 48 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधतोय. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या असून व्हिडीओ बऱ्याचवेळा शेअरही करण्यात आल आहे. नेटरकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं किस्मत हो तो ऐसी, तर कुणी म्हटलं एका बाणात दोन निशाणा नाही तर चार निशाणे. अशा मजेशीर निरनिराळ्या कमेंट या व्हिडीओवर येताना दिसतायेत.

advertisement

दरम्यान, सोशल मीडियावर लग्न कार्यातील अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरी नवरदेव तर कधी पाहुणे मंडळी. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

मराठी बातम्या/Viral/
Viral Video : पठ्ठ्यानं एका वेळी 4 मुलींशी केलं लग्न; लोक म्हणाले, ऊपर वाला देता है तो छप्पर फाडके....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल