बुध-यम केंद्र योग! 7 ऑक्टोबरपासून या राशीचे लोक आलिशान बंगला, गाडी खरेदी करणार, करोडपती होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं भ्रमण आणि त्यातून निर्माण होणारे योग मानवाच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतात.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं भ्रमण आणि त्यातून निर्माण होणारे योग मानवाच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. सध्या बुध ग्रह कन्या राशीत असून तो ३ ऑक्टोबर रोजी शुक्राच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुधाचा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जातो कारण शुक्राच्या राशीत बुधाचे आगमन नेहमीच धन, यश आणि सौभाग्याशी जोडले जाते.
यावेळी आणखी एक महत्वाचा योग तयार होत आहे. बुधाच्या या भ्रमणादरम्यान यम (प्लूटो) मकर राशीत असल्यामुळे ७ ऑक्टोबर रोजी दोन्ही ग्रह ९० अंशांवर येतील. या स्थितीला ज्योतिषशास्त्रात केंद्र योग म्हटले जाते. बुध-यम केंद्र योग हा सुमारे १५ दिवस टिकणार असून चार राशींसाठी हा काळ अत्यंत शुभकारक मानला जात आहे. या काळात अनेकांच्या मोठ्या इच्छांची पूर्तता होईल. विशेष म्हणजे, बुध ग्रह २४ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल, तोपर्यंत या योगाचे सकारात्मक परिणाम जाणवतील.
advertisement
वृषभ राशी
बुध-यम केंद्र दृष्टीमुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवर्धक ठरेल. आर्थिक परिस्थितीत मोठा बदल घडून येऊ शकतो. व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्यांना कर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे. नोकरीत विरोधक पराभूत होतील आणि तुमचं कार्यक्षेत्रातलं यश सर्वांना आश्चर्यचकित करेल. आदर, प्रतिष्ठा आणि समाजातील मान वाढेल.
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून फायदा होईल. पूर्वी ताणलेले संबंध सुधारतील आणि नवीन मैत्री किंवा ओळखी निर्माण होतील ज्या भविष्यात उपयोगी ठरतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने ध्येय साध्य होईल.
advertisement
तूळ राशी
बुध स्वतः तूळ राशीत असताना यमासोबत केंद्र योग तयार करत असल्याने या राशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनेल आणि प्रत्येक कामात आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल, समाजात प्रतिमा सुधारेल. अविवाहितांसाठी विवाहयोग प्रबळ राहील. करिअरमध्ये नवे मार्ग खुले होतील.
मकर राशी
मकर राशीतील यम आणि तूळ राशीतला बुध यांच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांसाठी नशीब खुलणार आहे. कामाच्या ठिकाणी नवी संधी मिळेल तसेच मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची वेळ येईल. व्यवसायात नफा होईल, घरच्यांचा पाठिंबा लाभेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पार पडतील आणि आदर-मान वाढेल.
advertisement
एकंदरीत, बुध-यम केंद्र योग चार राशींसाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे. या काळात सुरू केलेली कामे दीर्घकाळ फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन आणि प्रयत्नांमुळे या राशींच्या लोकांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होईल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 6:16 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
बुध-यम केंद्र योग! 7 ऑक्टोबरपासून या राशीचे लोक आलिशान बंगला, गाडी खरेदी करणार, करोडपती होणार