Signature Astrology: अशी सही करणाऱ्यांची तुरुंगवारी कधी तरी निश्चित असते; लवकरात-लवकर बदल करा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Signature Astrology: तुरुंगवारीचे संकेत आपल्या सहीमध्ये लपलेले असतात. विशिष्ट प्रकारची सहीची पद्धत तुरुंगवास भोगायला लावू शकते. अशा व्यक्ती आर्थिक फसवणूक, खून, चोरी किंवा इतर गुन्हे करू शकते, ज्यामुळे न्यायालयीन खटले किंवा तुरुंगवास होऊ शकतो.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात सही करण्याच्या पद्धतीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाची सही निराळी असते, कागदोपत्री कामांमध्ये सहीचे महत्त्व काय आहे, हे सर्वांनाच माहीत. सही हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. पण हीच सही आपल्यावर वाईट दिवस देखील आणू शकते. एखाद्या व्यक्तीची सही करण्याची पद्धत त्या व्यक्तीला तुरुंगात जाण्याची वेळ आणू शकते.
तुरुंगवारीचे संकेत आपल्या सहीमध्ये लपलेले असतात. विशिष्ट प्रकारची सहीची पद्धत तुरुंगवास भोगायला लावू शकते. अशा व्यक्ती आर्थिक फसवणूक, खून, चोरी किंवा इतर गुन्हे करू शकते, ज्यामुळे न्यायालयीन खटले किंवा तुरुंगवास होऊ शकतो.
या 5 प्रकारे सह्या करणं सोडा -
स्वाक्षरी ज्योतिष तज्ज्ञ विवेक त्रिपाठी सांगतात, आपल्या सहीविषयी महत्त्वाच्या पाच गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, ज्या व्यक्तीला तुरुंगवासाची शक्यता दर्शवितात. जे लोक सही करताना पहिल्या अक्षरावर वर्तुळ काढतात त्यांना त्यांच्या आयुष्यात तुरुंगवासाचा धोका असतो. त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
advertisement
सही करताना नावाच्या पहिल्या अक्षरावर दोनदा वर्तुळ काढतात, त्यांना तुरुंगात जाण्याची शक्यता जास्त असते. नावाच्या पहिल्या अक्षराला पूर्णपणे वेढणे म्हणजे एक वर्तुळ तयार करणे अशुभ मानले जाते. मनी बॅग काढणं वेगळं आणि अक्षराला पूर्ण गोल करणं वेगळं याचा त्रासदायक परिणाम होऊ शकतो.

advertisement
काही लोक युनिक सही काढण्याच्या प्रयत्नात नावाच्या पहिल्या अक्षराला दोनदा गोल काढतात. यामुळे अशा लोकांना तुरुंगवासाची परिस्थिती निर्माण होते. असे डबल गोल करणारे नाहक शनिला आपल्या आयुष्यात आमंत्रित करतात. शनि त्यांच्यासाठी संकट आणतो. शनि हा न्यायाचा देव आहे; तुम्ही केलेल्या कोणत्याही चुकीची शिक्षा शनीने देईल.

advertisement
काही लोक सही काढून त्याच्या वरती खाली किंवा भोवती रेषा मारतात, अशा लोकांनाही तुरुंगात जाण्याचा धोका असतो. काही लोक सही करताना, नावाच्या खाली आणि वर दोन रेषा काढतात आणि पहिले आणि शेवटचे अक्षर खूप मोठे करतात, असं करण्याची आवश्यकता नाही त्यानं तुरुंगवास होऊ शकतो.

advertisement
काही लोक आपलं नाव ओळखता येणार नाही, अशा पद्धतीनं सहीमध्ये काढतात. अतिशय अस्पष्ट पद्धतीने स्वाक्षरी करतात आणि त्याखाली डॉट काढतात त्यांनाही तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
सहीमध्ये दोनपेक्षा जास्त डॉट काढणाऱ्यांनाही धोका असतो. शिवाय काही लोक सहीच्या खाली किंवा वर तीन, चार किंवा त्याहून अधिक डॉट काढतात त्यांनाही धोका असतो. ज्यांच्या सहीत वरील काही गोष्टी आहेत, त्यांनी ताबडतोब आपली सही दुरुस्त करावी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2025 1:20 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Signature Astrology: अशी सही करणाऱ्यांची तुरुंगवारी कधी तरी निश्चित असते; लवकरात-लवकर बदल करा


