Guru Krupa: गुरुवारचे पॉवरफुल मंत्र! कामाला लागण्यापूर्वी नियमित उच्चार केल्यास दिवसभर शुभ परिणाम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Krupa: अनेक लोक गुरुवारी उपवास करतात. दत्तगुरुंची पूजा करण्यासाठीही भाविक गुरुवारी मंदिरांमध्ये जमतात. जो कोणी गुरुवारी विधीनुसार उपवास आणि पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक दिवशी विविध देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. गुरुवारचा दिवस श्रीहरी विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विशेष मानला जातो. अनेक लोक गुरुवारी उपवास करतात. दत्तगुरुंची पूजा करण्यासाठीही भाविक गुरुवारी मंदिरांमध्ये जमतात. जो कोणी गुरुवारी विधीनुसार उपवास आणि पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी काही विशेष मंत्रांचा जप करणे देखील खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मातील मंत्रांमध्ये मानसिक शक्ती आणि ऊर्जा देण्याचं सामर्थ्य आहे. आज आपण गुरुवारच्या काही विशेष मंत्रांबद्दल जाणून घेऊ.
गुरुवारचा शक्तिशाली मंत्र -
ॐ नमोः नारायणाय॥
ॐ नमोः भगवते वासुदेवाय॥
ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः॥
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥
शान्ताकारम् भुजगशयनम् पद्मनाभम् सुरेशम्
विश्वाधारम् गगनसदृशम् मेघवर्णम् शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तम् कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम्
वन्दे विष्णुम् भवभयहरम् सर्वलोकैकनाथम्॥
advertisement
-मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुडध्वजः।
मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥
-दन्ताभये चक्र दरो दधानं, कराग्रगस्वर्णघटं त्रिनेत्रम्।
धृताब्जया लिंगितमब्धिपुत्रया, लक्ष्मी गणेशं कनकाभमीडे।।
-ॐ वासुदेवाय विघ्माहे वैधयाराजाया धीमहि तन्नो धन्वन्तरी प्रचोदयात् ||
ॐ तत्पुरुषाय विद्महे अमृता कलसा हस्थाया धीमहि तन्नो धन्वन्तरी प्रचोदयात् ||
advertisement
विष्णू मंत्राचा जप कसा करावा?
मंत्र जप करण्यापूर्वी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करा.
पूजास्थळी आसनावर बसून भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि नंतर मंत्र जप करा.
कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा म्हणजे एक माळ जप करावा.
मंत्र जप करताना डोळे बंद ठेवा आणि श्री हरि विष्णूचे ध्यान करा.
मंत्र जप पूर्ण केल्यानंतर, श्रीहरी विष्णूसमोर डोके टेकवा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.
advertisement
भगवान श्री हरी विष्णूची आरती करा आणि त्यांना अन्न अर्पण करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 8:19 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Guru Krupa: गुरुवारचे पॉवरफुल मंत्र! कामाला लागण्यापूर्वी नियमित उच्चार केल्यास दिवसभर शुभ परिणाम