Rain Nakshatra: बापरे..! हत्तीसारखा पाऊस कोसळणार? चित्रा नक्षत्राला हत्तीचं वाहन, संकष्टीपासून पुन्हा...

Last Updated:

Rain Nakshatra: गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिल्यानंतर पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार पाहिल्यास येत्या संकष्टीपासून पावसाचे नक्षत्र चित्रा असून वाहन हत्ती आहे. वाहन हत्ती असल्यास पाऊस चांगला पडतो, असे म्हटले जाते.

News18
News18
मुंबई : यंदा पाऊस थांबण्याचं नावच घेत नाही अशी परिस्थिती झाली आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस शेतीसाठी मारक ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिल्यानंतर पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार पाहिल्यास येत्या संकष्टीपासून पावसाचे नक्षत्र चित्रा असून वाहन हत्ती आहे. वाहन हत्ती असल्यास पाऊस चांगला पडतो, असे म्हटले जाते.
पावसाचे वाहन हत्ती असणे आणि त्याचबरोबर चित्रा नक्षत्राचा योग असणे पावसासाठी पूरक मानलं जातं. पंचांग परंपरेनुसार पर्जन्यमानाचे भाकीत करण्यासाठी मेघांचे वाहन पाहिले जाते. एकूण दहा वाहने सांगितली आहेत, त्यापैकी हत्ती (गज) हे वाहन सर्वात उत्तम आणि शुभ मानले जाते. हत्ती हा स्थिरता, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हत्ती वाहन असल्यास त्या काळात उत्कृष्ट आणि समाधानकारक पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण चांगले राहते.
advertisement
पीक-पाण्याला कुठल्याही प्रकारची हानी न होता, सर्वत्र समान आणि पुरेसा पाऊस पडतो, ज्यामुळे शेतकरी सुखी होतात आणि उत्पन्न चांगले येते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक असल्यामुळे, हत्ती वाहन झाल्यास समृद्धी आणि ऐश्वर्य वाढते, असे मानले जाते.
advertisement
चित्रा नक्षत्र आणि पावसाचा संकेत - 27 नक्षत्रांपैकी चित्रा नक्षत्र हे देखील पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. चित्रा नक्षत्राचा कालावधी साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. हे नक्षत्र उत्तम कृषी कार्यांसाठी आणि चांगल्या हवामानासाठी शुभ मानले जाते. चित्रा नक्षत्रात पाऊस झाल्यास तो चांगला आणि हितकारक मानला जातो. या काळात पडणाऱ्या पावसाला 'हतक्याचा किंवा हाताचा पाऊस' असे म्हटले जाते. हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी किंवा शेतीची पुढील तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. पण, यंदा आधीच प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्यानं हत्ती नक्षत्रातील पावसामुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Rain Nakshatra: बापरे..! हत्तीसारखा पाऊस कोसळणार? चित्रा नक्षत्राला हत्तीचं वाहन, संकष्टीपासून पुन्हा...
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement