कोटींच्या मालकालाही रस्त्यावर आणतो 'हा' भयंकर योग, तुमचाही कुंडलीत असेल तर…
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक शुभ आणि अशुभ योगांचे वर्णन केले आहे. ज्याप्रमाणे 'राजयोग' एखाद्या सामान्य व्यक्तीला राजा बनवू शकतो, त्याचप्रमाणे कुंडलीतील काही अशुभ योग व्यक्तीला यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर आणू शकतात.
Kemdurm Yog : ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक शुभ आणि अशुभ योगांचे वर्णन केले आहे. ज्याप्रमाणे 'राजयोग' एखाद्या सामान्य व्यक्तीला राजा बनवू शकतो, त्याचप्रमाणे कुंडलीतील काही अशुभ योग व्यक्तीला यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर आणू शकतात. या अशुभ योगांपैकी सर्वात भयंकर मानला जाणारा योग म्हणजे 'केमद्रुम योग'. असे म्हटले जाते की, ज्याच्या कुंडलीत हा योग असतो, तो व्यक्ती कितीही मोठ्या घरात जन्मला असला, तरी त्याला आयुष्यात कधी ना कधी भीषण आर्थिक टंचाई आणि गरिबीचा सामना करावा लागतो.
केमद्रुम योग म्हणजे काय?
हा योग चंद्राशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत जेव्हा चंद्राच्या दुसऱ्या आणि बाराव्या भावात कोणताही ग्रह नसतो, तेव्हा केमद्रुम योग तयार होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, चंद्र जेव्हा कुंडलीत पूर्णपणे एकटा पडतो आणि त्याला कोणत्याही ग्रहाची सोबत किंवा दृष्टी नसते, तेव्हा हा दोष निर्माण होतो. चंद्र हा 'मनाचा कारक' आहे. जेव्हा तो एकटा असतो, तेव्हा व्यक्तीचे मन विचलित होते, निर्णयक्षमता कमकुवत होते आणि नशिबाची साथ मिळेनाशी होते.
advertisement
केमद्रुम योगाचे घातक परिणाम
1. आर्थिक अस्थिरता: या योगामुळे व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. कितीही कमावले तरी महिना अखेरीस हात रिकामेच राहतात. अनेकदा श्रीमंत कुटुंबात जन्म होऊनही हा योग व्यक्तीला कर्जाच्या खाईत लोटतो.
2. मानसिक अस्वस्थता आणि एकाकीपणा: केमद्रुम योगामुळे व्यक्तीला विनाकारण भीती वाटते आणि नेहमी एकटेपणा जाणवतो. मनात नकारात्मक विचार येतात आणि व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत होते.
advertisement
3. राजयोगाचे फळ मिळत नाही: सर्वात मोठी अडचण म्हणजे, जर तुमच्या कुंडलीत मोठे 'राजयोग' असतील, तरी केमद्रुम योगाच्या प्रभावामुळे त्या राजयोगांचे शुभ फळ तुम्हाला मिळू शकत नाही. हा योग इतर शुभ योगांना निष्फळ ठरवतो.
4. वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या: या योगामुळे कौटुंबिक सुखात कमतरता येते. जोडीदाराशी मतभेद होणे किंवा मुलांकडून अपेक्षित सुख न मिळणे, अशा समस्या उद्भवू शकतात.
advertisement
5. शिक्षणात आणि करिअरमध्ये अडथळे: बुद्धी तल्लख असूनही ऐन वेळी निर्णय चुकतात, ज्यामुळे करिअरमध्ये वारंवार चढ-उतार येतात. वारंवार नोकरी किंवा व्यवसाय बदलावा लागतो.
6. माता आणि वाहनाचे सुख कमी: चंद्र हा मातेचा कारक असल्याने, अशा व्यक्तींना आईचे सुख कमी मिळते किंवा आईचे आरोग्य नेहमी खराब राहते. तसेच घर आणि गाडीच्या सुखासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 2:49 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
कोटींच्या मालकालाही रस्त्यावर आणतो 'हा' भयंकर योग, तुमचाही कुंडलीत असेल तर…










