नेमकी चूक कुठे झाली? तो एक नियम पाळला असता तर कदाचित अजित पवार यांचा जीव वाचला असता; शेवटच्या 5 मिनिटांनी घात झाला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Deputy CM Ajit Pawar Plane Crash: कोणत्या पाच गोष्टी घडल्या नसत्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राण वाचवू शकले असते? या विमान अपघाताबद्दल विमान वाहतूक तज्ञांचे काय मत आहे आणि अपघाताची कोणती संभाव्य कारणे असू शकतात ते जाणून घ्या
Deputy CM Ajit Pawar Plane Crash: बारामती परिसरात झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून बारामतीकडे प्रवास करत होते, त्या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK असा होता. हे विमान सध्या VSR Aviation या कंपनीकडून ऑपरेट करण्यात येत होते. अपघातग्रस्त विमान हे Learjet 45XR मॉडेलचे होते.
या विमान अपघातानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, नेमकी चूक कुठे झाली? या दुर्घटनेबाबत विमान वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, टेकऑफ आणि लँडिंग हे उड्डाणातील सर्वात धोकादायक टप्पे असतात, कारण या क्षणी पायलटवर प्रचंड मानसिक आणि तांत्रिक दबाव असतो. वाऱ्याचा वेग, रनवेची स्थिती, विमानाचा वेग, उंची आणि नियंत्रण यामध्ये क्षणोक्षणी बदल होत असतात. अशा परिस्थितीत अगदी लहानशी चूकही मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते.
advertisement
…तर कदाचित अजित पवार यांचा जीव वाचला असता
खराब हवामान:
पावसाळी वातावरण, धुके आणि जोरदार वारे लँडिंगदरम्यान मोठ्या अडचणी निर्माण करतात. विशेषतः क्रॉस विंड (आडवा वारा) असल्यास विमानाचा तोल ढासळू शकतो. पावसामुळे रनवे घसरडा होतो, ज्यामुळे ब्रेक लावण्यासाठी लागणारे अंतर वाढते. जर हवामान अचानक बिघडले आणि अशा परिस्थितीत विमान जबरदस्तीने उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असेल, तर अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो.
advertisement
रनवे व्हिजिबिलिटी:
लँडिंगच्या वेळी पायलटला रनवेवरील लाईट्स आणि मार्किंग्स स्पष्ट दिसणे अत्यंत आवश्यक असते. जर धुके असेल, पावसामुळे काचेवर पाणी साचले असेल किंवा विमानतळावरील प्रकाश व्यवस्थेमध्ये बिघाड झाला असेल, तर पायलटचे योग्य एलाइनमेंट बिघडू शकते. यामुळे विमान रनवेवरून घसरू शकते आणि त्यातून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.
हार्ड लँडिंग:
सामान्य लँडिंगमध्ये विमान हळूहळू जमिनीवर उतरते. मात्र जर विमानाचा वेग जास्त असेल, उतरण्याचा कोन चुकीचा असेल किंवा पायलटने फ्लेअर उशिरा केला असेल, तर विमान जोरात जमिनीवर आपटते. यामुळे लँडिंग गियर तुटू शकतो किंवा विमान उड्या मारू शकते. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
advertisement
पायलटचा चुकीचा निर्णय:
विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, एव्हिएशनमध्ये एक महत्त्वाचा नियम आहे ‘If in doubt, go around’ म्हणजेच, जर लँडिंगबाबत किंचितही शंका वाटत असेल, तर विमान पुन्हा वर नेऊन दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करावा. मात्र योग्य वेळी हा निर्णय न घेतल्यास अपघाताची शक्यता वाढते.
तांत्रिक बिघाड:
लँडिंगच्या वेळी विमानातील अनेक यंत्रणा एकाच वेळी कार्यरत असतात लँडिंग गियर, फ्लॅप्स, ब्रेक्स, रिव्हर्स थ्रस्ट आदी. यापैकी कोणतीही एक प्रणाली निकामी झाली, तर विमान सुरक्षितपणे उतरवणे अत्यंत अवघड होते. अशा तांत्रिक बिघाडामुळेही विमान अपघात होऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 2:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नेमकी चूक कुठे झाली? तो एक नियम पाळला असता तर कदाचित अजित पवार यांचा जीव वाचला असता; शेवटच्या 5 मिनिटांनी घात झाला









