Love Palmistry: लव्ह लाईफ सोडाच वैवाहिक जीवनातही सुख नाही मिळत; तळहातावर अशी रेषा म्हणजे दशा

Last Updated:

Astrology Love Line: तळहातामध्ये करंगळीच्या (कनिष्ठा बोट) अगदी खाली विवाह रेषा असते. ही रेषा प्रेम रेषा किंवा लव लाइन म्हणून ओळखली जाते. याच रेषांवरून कळते की एखाद्या व्यक्तीचे प्रेम जीवन कसे असणार आहे.

News18
News18
मुंबई : हातावरील रेषा आपल्या जीवनातील अनेक चांगल्या-वाईट शक्यता दर्शवतात. कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य कसे असू शकते, तिचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, तिचा स्वभाव कसा आहे, या सर्व गोष्टींचा अंदाज त्याच्या तळहातावरील रेषा पाहून लावला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, तळहातावरील विवाह रेषा किंवा प्रेम रेषा पाहूनही त्या व्यक्तीचे प्रेम किंवा वैवाहिक जीवन कसे असेल याचा अंदाज लावता येतो. या संदर्भात, आपण प्रेम जीवनाशी संबंधित या महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया.
प्रेमसंबंधाचा वाईट शेवट होतो - तळहातामध्ये करंगळीच्या (कनिष्ठा बोट) अगदी खाली विवाह रेषा असते. ही रेषा प्रेम रेषा किंवा लव लाइन म्हणून ओळखली जाते. याच रेषांवरून कळते की एखाद्या व्यक्तीचे प्रेम जीवन कसे असणार आहे. लग्नानंतर आयुष्य कसे जाईल आणि जीवनात प्रेमसंबंधांची स्थिती कशी राहील. ही रेषा तिच्या रचनेतून प्रेम जीवनाबद्दल अनेक संकेत देते.
advertisement
कोणाच्या हातात प्रेम रेषा स्पष्ट दिसत नसेल किंवा तुटलेली असेल, तर ते चांगले मानले जात नाही. अशा रेषा सूचित करतात की व्यक्तीच्या प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. प्रेम जीवनापासून ते वैवाहिक जीवनापर्यंत त्रासांचा सामना करावा लागू शकतो. तळहातावर अशा रेषा असल्यामुळे प्रेमात वारंवार फसवणूक होणे, नातेसंबंध वारंवार तुटणे आणि प्रेमाचा शेवट वाईट होण्याची शक्यता वाढते.
advertisement
योग शुभ कसा ओळखावा - तळहातातील सूर्य रेषेशी (Sun Line) विवाह रेषेचा संयोग होत असेल, तर तो एक शुभ संकेत मानला जाऊ शकतो. अशा प्रकारची रेषा दर्शवते की व्यक्ती सुखाने वैवाहिक जीवन व्यतीत करेल. ज्यांच्या तळहातावर अशी रेषा असते, त्यांच्यासाठी प्रेमविवाह करण्याचे सर्व मार्ग खुले होतात. लग्न चांगल्या घरात आणि चांगल्या जीवनसाथीसोबत होते. जीवन शांततेत व्यतीत होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Love Palmistry: लव्ह लाईफ सोडाच वैवाहिक जीवनातही सुख नाही मिळत; तळहातावर अशी रेषा म्हणजे दशा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement