Kartiki Ekadashi 2025: शुभ योगात आज प्रबोधिनी एकादशी! पूजेसाठी अभिजीत मुहूर्त चुकवू नका, पहा विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ekadashi 2025 Today: हिंदू धर्मात प्रबोधिनी स्मार्त एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर शुभ आणि मंगल कार्ये, म्हणजे लग्न, गृहप्रवेश, जावळ-बारसं संस्कार इत्यादी, पुन्हा सुरू होतात. धार्मिक मान्यतांनुसार, प्रबोधिनी स्मार्त एकादशीचं व्रत केल्यानं...
मुंबई : आज प्रबोधिनी स्मार्त एकादशी तिथीचं व्रत साजरं केलं जाईल. दरवर्षी कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला हे व्रत केलं जातं. हिंदू धर्मात प्रबोधिनी स्मार्त एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर शुभ आणि मंगल कार्ये, म्हणजे लग्न, गृहप्रवेश, जावळ-बारसं संस्कार इत्यादी, पुन्हा सुरू होतात. धार्मिक मान्यतांनुसार, प्रबोधिनी स्मार्त एकादशीचं व्रत केल्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो आणि सगळे पाप नष्ट होतात.
प्रबोधिनी स्मार्त एकादशी 2025 पूजनाचे मुहूर्त -
द्रिक पंचांगानुसार, अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी सुरू होऊन दुपारी 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत राहील आणि राहुकाळ सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी सुरू होऊन 10 वाजून 42 मिनिटांपर्यंत राहील. या दिवशी सूर्य तूळ राशीत आणि चंद्र कुंभ राशीत भ्रमण करेल. प्रबोधिनी स्मार्त एकादशीला पंचक काळ दिवसभर राहणार आहे. तसंच, भद्रा संध्याकाळी 8 वाजून 27 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 24 मिनिटांपर्यंत राहील. प्रबोधिनी स्मार्त एकादशीला पूजनासाठी अभिजीत मुहूर्त आणि गोधूलि मुहूर्त सर्वात उत्तम मानले जातात.
advertisement
विजय मुहूर्त: दुपारी 1 वाजून 55 मिनिटांपासून ते 2 वाजून 39 मिनिटांपर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 5 वाजून 36 मिनिटांपासून ते 6 वाजून 02 मिनिटांपर्यंत
निशिता मुहूर्त: रात्री 11 वाजून 39 मिनिटांपासून ते 2 नोव्हेंबरला रात्री 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत
रवि योग: सकाळी 6 वाजून 33 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत
advertisement
प्रबोधिनी स्मार्त एकादशी 2025 तिथी
एकादशी तिथीची सुरुवात: 1 नोव्हेंबर, सकाळी 9 वाजून 13 मिनिटांपासून
एकादशी तिथीची समाप्ती: 2 नोव्हेंबर, सकाळी 7 वाजून 33 मिनिटांपर्यंत
प्रबोधिनी स्मार्त एकादशी पारण (उपवास सोडण्याचा) मुहूर्त: 3 नोव्हेंबर, सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपासून ते 8 वाजून 32 मिनिटांपर्यंत
प्रबोधिनी स्मार्त एकादशी 2025 शुभ योग -
advertisement
प्रबोधिनी स्मार्त एकादशीच्या दिवशी रवि योग, वृद्धी योग, ध्रुव योग, हंस राजयोग आणि रूचक राजयोग असे शुभ योग बनत आहेत, ज्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. या शुभ योगांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास सर्व कार्ये सिद्ध होतात आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. या दिवशी केलेलं दान, व्रत, स्नान, दीपदान आणि जप १ हजार पट अधिक फळ देतो.
advertisement
प्रबोधिनी स्मार्त एकादशीचं धार्मिक महत्त्व -
स्कंद आणि पद्म पुराण या ग्रंथांमध्ये प्रबोधिनी स्मार्त एकादशीचा विशेष उल्लेख आढळतो, ज्यात सांगितलं आहे की, प्रबोधिनी स्मार्त एकादशी तिथीला श्री हरी (भगवान विष्णू) चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि सृष्टीचं संचालन करायला सुरुवात करतात. त्याचबरोबर, या दिवसापासून घराघरात शुभ कार्यांची सुरुवात होते. प्रबोधिनी स्मार्त एकादशीला देवोत्थान एकादशी असंही म्हणतात आणि उत्तर भारतातल्या काही भागांमध्ये या दिवशी तुळशी विवाह देखील साजरा केला जातो. शास्त्रानुसार, तुळशीचं पूजन आणि विवाह केल्याने कन्यादानासारखं पुण्य मिळतं आणि व्रत ठेवल्याने भाग्य चमकतं व सर्व कार्यं यशस्वी होतात. भगवान विष्णूंच्या जागृतीनंतर सर्व शुभ कार्यांची पुन्हा सुरुवात होते. विवाह, गृहप्रवेश इत्यादी सर्व मंगल कार्ये या दिवसापासून पुन्हा सुरू केली जातात.
advertisement
प्रबोधिनी स्मार्त एकादशी पूजा पद्धत -
एका चौरंगावर पिवळं वस्त्र अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. भगवान विष्णूंच्या जवळ तुळस आणि शाळीग्राम अवश्य ठेवायला पाहिजे. त्यानंतर चारी बाजूंनी गंगाजलाचा शिडकाव करा. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायला पाहिजे. आता पूजास्थळी गाईच्या शेणात गेरू मिसळून भगवान विष्णूंचे चरणचिन्ह (पाऊलखुणा) बनवा आणि चंदन, अक्षत (तांदूळ), फळं, फुलं, धूप, दीप, मिठाई इत्यादी अर्पण करा. त्याचबरोबर नवीन मोसमी फळं अर्पण करा. आता दान करण्याची सामग्री, ज्यात धान्य आणि वस्त्र आहेत, ती वेगळी तयार करायला पाहिजे. दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा, शंख-घंटी वाजवत 'उठा देवा, उठा देवा' या मंत्राचा जप करा, ज्यामुळे सर्व देवता जागे होतील. पंचामृताचा नैवेद्य दाखवा. व्रत करत असाल, तर तिथीच्या दुसऱ्या दिवशी पारण (उपवास सोडताना) करतेवेळी ब्राह्मणाला दान द्यायला पाहिजे.
advertisement
मंत्र - ॐ नमो भगवते वासुदेवाय और ॐ नमो नारायणाय
विष्णु गायत्री मंत्र
ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्
शांताकारं मंत्र
शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगम्।
लक्ष्मीकांतं कमल नयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।
विष्णू आरती -
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे।
भक्तजनों के संकट क्षण में दूर करे॥
जो ध्यावै फल पावै, दुख बिनसे मन का।
सुख-संपत्ति घर आवै, कष्ट मिटे तन का॥ ॐ जय…॥
मात-पिता तुम मेरे, शरण गहूं किसकी।
तुम बिन और न दूजा, आस करूं जिसकी॥ ॐ जय…॥
तुम पूरन परमात्मा, तुम अंतरयामी॥
पारब्रह्म परेमश्वर, तुम सबके स्वामी॥ ॐ जय…॥
तुम करुणा के सागर तुम पालनकर्ता।
मैं मूरख खल कामी, कृपा करो भर्ता॥ ॐ जय…॥
तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति।
किस विधि मिलूं दयामय! तुमको मैं कुमति॥ ॐ जय…॥
दीनबंधु दुखहर्ता, तुम ठाकुर मेरे।
अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे॥ ॐ जय…॥
विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा।
श्रद्धा-भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा॥ ॐ जय…॥
तन-मन-धन और संपत्ति, सब कुछ है तेरा।
तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा॥ ॐ जय…॥
जगदीश्वरजी की आरती जो कोई नर गावे।
कहत शिवानंद स्वामी, मनवांछित फल पावे॥ ॐ जय…॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Kartiki Ekadashi 2025: शुभ योगात आज प्रबोधिनी एकादशी! पूजेसाठी अभिजीत मुहूर्त चुकवू नका, पहा विधी


