IND vs AUS T20i : टीम इंडियाचा 'लकी चार्म' मेलबर्नवर अनलकी, 37 मॅच अन् 6 वर्षानंतर शिवम दुबेच्या जादूचा 'द एन्ड'

Last Updated:

Shivam dube luck streak broken : तब्बल 6 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Shivam dube luck streak broken
Shivam dube luck streak broken
India vs Australia 2nd T20i : मेलबर्नवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूडसमोर भारताचे बॅटर्स कोसळले. त्यामुळे एकट्या अभिषेक शर्माला कांगारूंसोबत लढावं लागलं. सलामीवीर अभिषेकने एकट्याने झुंज दिल्याने टीम इंडियाला 125 धावाच करता आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सने सामना जिंकला. अशातच आता टीम इंडियाचा 'लकी चार्म' मेलबर्नवर अनलकी ठरल्याचं पहायला मिळालं आहे.

टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का

शिवम दुबे याने त्यांच्या कारकिर्दीत एक असा अविश्वसनीय विक्रम नोंदवला होता जो जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला जमलेला नाही. शिवम दुबेच्या उपस्थितीत टीम इंडियाने सलग 37 मॅचमध्ये पराभव स्वीकारला नव्हता. हा विक्रम 2019 ते 2025 या कालावधीत कायम होता. या कालावधीमधील मॅचमध्ये भारताने फक्त विजयच नाही तर T20 क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केलं होतं. अशातच मेलबर्नवरील पराभवासोबतच आता टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का आहे. शिवम दुबेच्या उपस्थितीत टीम इंडियाचा पहिल्यांदाच पराभव झालाय.
advertisement

6 वर्षानंतर पहिल्यांदाच...

जेव्हा जेव्हा शिवम दुबे टीम इंडियामध्ये होता, तेव्हा तेव्हा टीम इंडियाने कधीही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. 6 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हा विक्रम डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या T20I मॅचनंतर सुरू झाला होता. या 37 मॅचच्या काळात भारताने 34 मॅचमध्ये विजय मिळवला, एक मॅच टाय झाली आणि दोन मॅच अनिर्णित राहिल्या होत्या.
advertisement

टीमसाठी 'लकी चार्म' ठरला अनलकी

दरम्यान, शिवम दुबे याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि ऑलराऊंडर योगदानामुळे संघात एक चांगला बॅलन्स आला होता, ज्यामुळे तो टीमसाठी 'लकी चार्म' बनला होता. शिवम दुबे यांचा हा विक्रम अखेर ऑस्ट्रेलियाने संपुष्टात आणला. मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या T20I मॅचमध्ये भारताला 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला, आणि दुबे यांची सलग 37 मॅचची अपराजित मालिका खंडीत झाली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS T20i : टीम इंडियाचा 'लकी चार्म' मेलबर्नवर अनलकी, 37 मॅच अन् 6 वर्षानंतर शिवम दुबेच्या जादूचा 'द एन्ड'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement