Vastu Tips: नव्या घरात गेल्यापासून अडचणी-त्रास वाढलेत? टेन्शन दूर करणारे सोपे वास्तु उपाय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi नवीन घरात शिफ्ट झाल्यावर अचानक अडचणी-त्रास वाढतात. कधी नोकरीत अडचण, कधी व्यवसायात त्रास तर कधी घरात सतत वाद- तणाव वाढू लागतो. बरेच लोक मग सांगतात की, जुन्या घरात सगळं व्यवस्थित चाललं होतं
मुंबई : काही लोकांच्या बाबतीत अनेकदा असं घडतं की, लोक नवीन घरात शिफ्ट झाल्यावर अचानक अडचणी-त्रास वाढतात. कधी नोकरीत अडचण, कधी व्यवसायात त्रास तर कधी घरात सतत वाद- तणाव वाढू लागतो. बरेच लोक मग सांगतात की, जुन्या घरात सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण जसे नवीन ठिकाणी आलो...बिघडायला लागलंय सगळं. वास्तुशास्त्रामध्ये याची अनेक कारणं सांगितली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
आज-काल जागाच (जमीन-प्लॉट) मिळत नसल्यानं अनेक घरं अशा ठिकाणी बांधली जातात, जिथं पूर्वी स्मशानभूमी, दफनभूमी किंवा अगदी ओसाड जागा राहिलेली असते. अशा जागांवर नकारात्मक ऊर्जा जास्त असते. वर्षानुवर्षे बंद असलेल्या किंवा दुर्लक्षित जागांवर अदृश्य छाया किंवा वाईट शक्ती घर करून राहतात. एखादं नवीन कुटुंब अशा घरात राहायला लागतं, तेव्हा हळूहळू त्यांच्या जीवनात अडचणी, आजारपण किंवा कारण नसताना भीती वाढू शकते. म्हणूनच, घर विकत घेण्यापूर्वी किंवा भाड्याने घेण्यापूर्वी त्याचा इतिहास जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
घर विकत घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
वास्तु तज्ज्ञांनुसार, घर विकत घेताना काही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जमिनीची माती आणि इतिहास जाणून घ्या, शक्य असल्यास जमिनीच्या मातीची तपासणी करा. मातीचा स्वभाव घराच्या ऊर्जेवर परिणाम करतो.
दीर्घकाळापासून बंद असलेले घर घेऊ नका, अशा घरांमध्ये बहुतांशी नकारात्मक लहरी जमा झालेल्या असतात. दुर्भाग्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचं घर खरेदी करू नका, जर एखाद्या व्यक्तीने आजारपण, भीती किंवा सततच्या त्रासामुळे घर विकलं असेल, तर तीच ऊर्जा नवीन घरात येण्याची शक्यता असते.
advertisement
अपघात किंवा आत्महत्या झालेल्या घरांपासून दूर रहा: अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप खोलवर रुजलेली असते. या सर्व गोष्टींची खबरदारी तुम्हाला भविष्यातील अडचणींपासून वाचवू शकते.
advertisement
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे सोपे उपाय
दुर्गा सप्तशती किंवा सुंदरकांडचा पाठ: वाईट शक्ती, नजरदोष आणि अडचणी दूर करण्यासाठी हा पाठ अत्यंत प्रभावी मानला जातो.
सर्व बाधा निवारण मंत्र: ग्रहांच्या स्थितीनुसार हा मंत्र करून घेतल्यास घरातील ऊर्जा संतुलित होते आणि थांबलेली कामं मार्गी लागतात.
अशोक वृक्षाच्या पानांचा उपाय: देव्हाऱ्यात अशोक वृक्षाची सात पानं ठेवून पूजा करा. पानं सुकल्यावर ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. काही दिवस हा उपाय करून घरात शांती आणता येते.
advertisement
घरात सकारात्मकता कशी टिकवून ठेवावी?
रोज सकाळी घरात धूप (सुगंधित वस्तू) जाळा. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा आणि दररोज संध्याकाळी आपल्या इष्ट देवतेच्या नावाने दिवा नक्की लावा. घरात हवा आणि नैसर्गिक प्रकाश येऊ द्या आणि घराचे कोपरे घाण ठेवू नका. घरात हलका सुगंध ठेवा. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही घरातील वातावरण खूप बदलतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 10:46 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: नव्या घरात गेल्यापासून अडचणी-त्रास वाढलेत? टेन्शन दूर करणारे सोपे वास्तु उपाय










