Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या पूजेत असायलाच हव्यात या 6 गोष्टी; अन्यथा केलेली मेहनत निष्फळ

Last Updated:

Dhanteras 2025: या तिथीला आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते, अशी मान्यता आहे. दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा पाळली जाते. जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी

News18
News18
मुंबई : आज दिवाळीतील महत्त्वाचा धनत्रयोदशी सण आहे. हा पाच दिवसांच्या दिवाळीचा पहिला दिवस असतो. धनत्रयोदशीपासून दिवाळीचा सण सुरू होतो. या तिथीला आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते, अशी मान्यता आहे. दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा पाळली जाते. जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी, भांडी, जमीन-जुमला यांची शुभ खरेदी करतो, त्याच्या धनात तेरा पटीने वाढ होते, असे म्हटले जाते.
या दिवशी वैद्य (डॉक्टर्स) अमृत धारण केलेल्या भगवान धन्वंतरीची पूजा करतात. याच दिवसापासून देव यमराजासाठी दीपदान करून दिवे लावण्यास सुरुवात होते आणि हे दिवे पाच दिवसांपर्यंत लावले जातात. या दिवशी खरेदी केलेले सोने किंवा चांदीचे धातूचे भांडे अक्षय सुख देतात.
त्रयोदशी तिथीची वेळ:
त्रयोदशी तिथी सुरू: १८ ऑक्टोबर २०२५, दुपारी १२:१८ वाजता
advertisement
त्रयोदशी तिथी समाप्त: १९ ऑक्टोबर २०२५, दुपारी १:५१ वाजता
रोग, मृत्यू भयापासून मुक्ती देतो यमदीप:
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप देखील प्रज्वलित केला जातो. रोग, शोक, भय, अपघात आणि अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराबाहेर यमदीप लावण्याची परंपरा आहे. याच दिवशी धन्वंतरींनी शंभर प्रकारच्या मृत्यूंची माहिती देऊन अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी यमदीप लावण्याची गोष्ट सांगितली होती.
advertisement
धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी यमराजासाठी दीपदान करावे. यालाच 'यम दीपदान' म्हणतात. घराच्या मुख्य दाराबाहेर शेणाने सारवून, त्यानंतर मातीच्या २ दिव्यांमध्ये तेल टाकून ते प्रज्वलित करावे. दिवे लावताना 'दीपज्योति नमोस्तुते' या मंत्राचा जप करत आपले मुख दक्षिण दिशेकडे ठेवावे. धनत्रयोदशीच्या दिवशी 'यम दीपदान' केल्यास घरातील कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही, असं मानलं जातं.
advertisement
माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी काढली जाते रांगोळी: या दिवशी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य दारावर रांगोळी काढली जाते आणि महालक्ष्मीचे दोन छोटे पदचिन्हे (पाऊलखुणा) लावले जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीसोबत धन्वंतरी आणि कुबेर यांचीही पूजा केली जाते. धन्वंतरी याच तिथीला समुद्र मंथनातून प्रकट झाले होते. प्राचीन काळात लोक या दिवशी नवीन भांडी खरेदी करून त्यात खीर-पक्वान्न ठेवून धन्वंतरी देवाला नैवेद्य दाखवत असत.
advertisement
धनत्रयोदशीच्या या वस्तूंचा वापर करा:
पान: ज्योतिषतज्ज्ञांच्या मते शास्त्रांमध्ये धनत्रयोदशीच्या पूजेसाठी पानाचा वापर करावा. पानामध्ये देवी-देवतांचा वास मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पूजेत याचा वापर शुभ मानला गेला आहे.
सुपारी: धनत्रयोदशीच्या पूजेत सुपारीचा वापर केल्याशिवाय पूजा सुरू होत नाही. सुपारीला ब्रह्मदेव, यमदेव, वरुण देव आणि इंद्रदेव यांचे प्रतीक मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेत वापरलेली सुपारी तिजोरीत ठेवणे लाभदायक ठरते.
advertisement
आख्खे धणे: धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही आख्खे धणे (कोथिंबीरचे बी) खरेदी करून आणा आणि ते माता लक्ष्मीसमोर अर्पण करा. यामुळे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील.
बताशा आणि लाह्या: बताशा माता लक्ष्मीचा सर्वात प्रिय नैवेद्य आहे. माता लक्ष्मीच्या पूजेत बताशाचा वापर केल्यास प्रत्येक अडचणीचे समाधान होते. या दिवशी लाह्या नक्की खरेदी करायला हव्यात. यामुळे धन-समृद्धी टिकून राहते. पूजेपूर्वी मातेसमोर दीपक (दिवा) लावायला विसरू नका. यामुळे यमदेव प्रसन्न होतात.
advertisement
कापूर: माता लक्ष्मी, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांच्या पूजेत कापूर नक्की जाळावा. कापूर जाळल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या पूजेत असायलाच हव्यात या 6 गोष्टी; अन्यथा केलेली मेहनत निष्फळ
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement