Shravan 2025: घरात शंकराचा चतुर्भुज फोटो लावणं शुभ की अशुभ? वास्तुनुसार दिशा, नियम, जीवनावरील परिणाम

Last Updated:

Vastu Tips For Lord Shiva Image: आज आपण शंकराच्या चतुर्भुज रुपाविषयी जाणून घेऊ. वास्तुशास्त्रात देव-देवतांच्या फोटोंबाबत काही विशेष मार्गदर्शक केलं आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून शंकराच्या चतुर्भुज फोटोबाबत समजून घेऊ.

News18
News18
मुंबई : महादेवाच्या क्रोधाला सगळेजण घाबरतात, याविषयी अनेक कथा आपण ऐकल्याच असतील. शिवशंकर क्रोधित होऊन तांडव करू लागल्या तिन्ही लोकात हाहाकार माजतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पण, रुद्रावतार असलेले शिव तितके कोमल असून साध्या भक्तीनंही भाविकावर प्रसन्न होतात, म्हणूनच त्यांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं. शिव कल्याण आणि करुणेचे प्रतीक देखील आहेत. महादेवाचा फोटो किंवा मूर्ती घरात लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आज आपण शंकराच्या चतुर्भुज रुपाविषयी जाणून घेऊ. वास्तुशास्त्रात देव-देवतांच्या फोटोंबाबत काही विशेष मार्गदर्शक केलं आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून शंकराच्या चतुर्भुज फोटोबाबत समजून घेऊ. हा फोटो, कसा कुठे ठेवणे शुभ ठरेल याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ.
वास्तुशास्त्रानुसार, घरात भगवान शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. शिव आनंदी मनःस्थितीत, ध्यानस्थ अवस्थेत किंवा चतुर्भुज स्वरूपात असतात, त्यांचे ते रुप अधिक सकारात्मक मानले जाते. चतुर्भुज शिवाचे हे रूप भगवान विष्णूंपेक्षा वेगळे आहे, ज्यामध्ये ते एका विशेष स्थितीत बसलेले पाहायला मिळतात.
घरात शंकराचा चतुर्भुज फोटो लावण्याचे फायदे:
१. मनाला शांती राहते.
advertisement
२. घरात सकारात्मकता येते.
३. कुटुंबामध्ये परस्पर समन्वय राहतो.
४. आर्थिक आणि मानसिक त्रासांपासून सुटका मिळते.
वास्तुशास्त्रानुसार, शंभू शंकराचा फोटो किंवा मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. याचे कारण म्हणजे महादेवाचे मूळ निवासस्थान कैलास पर्वतावर आहे, कारण हा पर्वत उत्तरेकडे आहे. यामुळे घरात उर्जेचा प्रवाह चांगला राहतो, शंकराचे आशीर्वाद राहतात.
advertisement
फोटो लावताना या गोष्टी लक्षात ठेवा:
१. महादेवाचा फोटो अशा ठिकाणी लावावा, जिथे येणारे-जाणारे लोक तो पाहू शकतील.
२. शंकराचे फोटो आनंदी मुद्रेत असावे.
३. चित्र जमिनीपासून थोडे उंच असले पाहिजे, ते खूप खाली किंवा खूप उंच ठेवू नये.
शंकराचा चतुर्भुज फोटो अशा ठिकाणी लावू नये -
१. बेडरूम: येथे देवतांचा फोटो लावणे अशुभ मानले जाते.
advertisement
२. बाथरूमसमोर अजिबात लावू नये.
३. पायऱ्यांखाली किंवा स्टोअर रूममध्ये लावू नये, त्याचा उर्जेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
फोटो लावण्याचे नियम -
१. ज्या भिंतीवर फोटो लावला आहे, ती भिंत नेहमीच स्वच्छ असावी.
२. दररोज पूजा करा, फक्त फोटो लावणं पुरेसं नाही.
३. घरात शिव मंत्रांचा जप करा - ओम नमः शिवाय
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: घरात शंकराचा चतुर्भुज फोटो लावणं शुभ की अशुभ? वास्तुनुसार दिशा, नियम, जीवनावरील परिणाम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement