शुक्र ग्रहचा सिंह राशीतून कन्यामध्ये होणार प्रेवश; कोणाला होणार फायदा पाहा Video
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशिमध्ये प्रवेश करतो आहे.
वर्धा, 2 नोव्हेंबर: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे आणि या महिन्यामध्ये शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशिमध्ये 3 नोव्हेंबरला प्रवेश करतो आहे. त्यामुळे कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीला नेमके काय फायदे होऊ शकतात किंवा या कर्क, कन्या आणि वृश्चिक या तीन राशींवर या बदलाचा नेमका काय परिणाम होणार आहे. यासंदर्भात वर्ध्यातील ज्योतिष्याचार्य अरुणा अण्णाजी कोटेवार यांनी माहिती दिली आहे.
कन्या राशीला होणार फायदा 
शुक्रवार 3 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी शुक्राचा कन्या राशीमध्ये प्रवेश होत आहे. याचा प्रभाव कन्या राशीला गुरु आठवा असल्यामुळे आतापर्यंत काही लोकांना त्रास झाला आहे. परंतु कन्या राशीचा शुक्र हा मित्रग्रह असल्यामुळे या राशीवाल्यांना काहीही त्रास होणार नाही. त्यामुळे त्याचे परिणाम गुरु ऐवजी चांगलेच येतील. व्यवसायात फायदा होईल, चांगली संधी येतील, नोकरीत फायदा होईल, व्यवसायात चांगले संबंध टिकून राहतील, ओळखीद्वारे अनेक कामे होतील, विरोधी लोकांवर मात करून यश मिळविणे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण राहील, मंगल कार्य होतील, प्रकृती चांगली राहील, असं जोतिष्याचार्य सांगतात.
advertisement
होऊ शकते नवीन खरेदी 
वृश्चिक राशी ही मंगळाची असल्यामुळे बुध आणि शुक्र या राशीला साथ देणारे आहेत. अनेक अडचणीतून मार्ग काढून मनोबल वाढेल योजलेले कामे पूण होतील, दगदग त्रास झाला तरी उत्साह वाढेल, मनोबल टिकून राहील, प्रवासात त्रास नुकसान यापासून सतर्कता राहील. मित्रांची साथ चांगली लाभेल, कौटुंबिक समारंभ नवीन खरेदी वगैरे होईल, असं जोतिष्याचार्य सांगतात.
advertisement
कर्क राशील ठरू शकतो त्रासदायक 
कर्क राशीला रवी मंगळ गुरु प्रतिकूल आहे. बाकीचे ग्रह बाकीचे ग्रहमान बरे आहेत. परंतु रवी मंगळ पाचवा असल्यामुळे संततीला, त्रासदायक विद्यार्थ्यांना त्रासदायक, कौटुंबिक समस्या वाढविणे, उत्तरार्धात मात्र पैसा चांगला मिळेल,आत्मविश्वास वाढेल, नवीन व्यवसायात फायदा होईल कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी काही कामात आत्मविश्वास वाढेल असं जोतिष्याचार्य सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
November 02, 2023 10:41 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शुक्र ग्रहचा सिंह राशीतून कन्यामध्ये होणार प्रेवश; कोणाला होणार फायदा पाहा Video

              