अजित पवारांना भेटलो, शरद पवारांनाही भेटणार, भास्कर जाधवांच्या लेकाने 'मिटिंग डिप्लोमसी'चं कारण सांगितलं!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vikrant Jadhav Guhagar Vidhan Sabha: यंदाच्या साली काहीही करून मुलाला विधानसभेची उमेदवारी द्यायची, असा प्रण भास्कर जाधव यांचा आहे.
चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भेटीचे विविध अर्थ काढले गेले. अजित पवार यांना भेटून जाधव बापलेकाने शिवसेना ठाकरे गटावर दबावतंत्र वापरल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या सांगण्यावरूनच मी अजितदादांची भेट घेतली, असा गौप्यस्फोट करून विक्रांत जाधव यांनीही अजितदादांची भेट म्हणजे दबावतंत्राचा भाग असल्याचे संकेतच अप्रत्यक्षरित्या दिले.
भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची गुहागर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची इच्छा आहे. यंदाच्या साली काहीही करून मुलाला विधानसभेची उमेदवारी द्यायची, असा प्रण भास्कर जाधव यांचा आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहे.
advertisement
भास्कर जाधव यांच्या सांगण्यावरूनच मी अजितदादांची भेट घेतली
दुसरीकडे आमदार भास्कर जाधव यांच्या सांगण्यावरूनच अजितदादांची भेट घेतल्याचे सांगत जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, असे भेटीमागचे कारण विक्रांत जाधव यांनी सांगितले. भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगत उद्या शरद पवार यांना देखील भेटण्यासाठी मी जाणार आहे, असेही विक्रांत जाधव यांनी सांगितले. आमची भेट केवळ कौटुंबिक असून त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शहरात आल्यामुळे त्यांचे स्वागत करणे ही आमची संस्कृती असल्याचे आवर्जून विक्रांत जाधव यांनी सांगितले.
advertisement
अजित पवार यांच्या सोबतीच्या भेटीत काय संवाद झाला?
आमदार भास्कर जाधव हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. ते जर चिपळूणमध्ये असते तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनीच स्वागत केले असते. बाबांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत स्वत:ला एक शिस्त लावून घेतली आहे. जबाबदार पदावरील कुणीही तालुक्याच्या दौऱ्यावर आले तर त्यांचे स्वागत करणे लोकप्रतिनिधीचे काम आहे, असे आम्ही मानतो. परंतु बाबा काल कोल्हापूरच्या
advertisement
दौऱ्यावर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, असे विक्रांत जाधव यांनी सांगितले.
शरद पवार यांचीही भेट घेणार
तसेच सोमवारी शरद पवार चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. जर भास्कर जाधव चिपळूणमध्ये असतील तर आम्ही दोघेही शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ, असे विक्रांत यांनी सांगितले. जर महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताला भास्कर जाधव यांनी मला पाठवले तर आमच्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या स्वागतालाही जाणे आमचे क्रमप्राप्त आहे, असेही विक्रांत म्हणाले.
Location :
Chiplun,Ratnagiri,Maharashtra
First Published :
Sep 22, 2024 5:04 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अजित पवारांना भेटलो, शरद पवारांनाही भेटणार, भास्कर जाधवांच्या लेकाने 'मिटिंग डिप्लोमसी'चं कारण सांगितलं!










