HSRP Number Plate साठी अजून अर्ज केला नाही, कुठे करायचा अर्ज कशी मिळवायची?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
2019 पूर्वी घेतलेल्या 10 वर्ष जुन्या गाड्यांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य आहे. अर्जाची अंतिम मुदत 30 जून आहे. अर्जासाठी SIAM, Book My HSRP आणि महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटचा वापर करा.
मुंबई: तुमची गाडी 10 वर्ष जुनी आहे का? तुमची गाडी 2019 पूर्वी घेतलेली आहे का? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावाली लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे. ज्यांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी तातडीनं ही नंबरप्लेट बसवून घ्यावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ होणार नाही असंही सांगितलं जात आहे. भारत सरकारने सर्व वाहनांसाठी High-Security Registration Plate अनिवार्य केली आहे. ही प्लेट केवळ सुरक्षा दृष्टीकोनातूनच नव्हे तर वाहनांची ट्रॅकिंग क्षमता अधिक सक्षम करण्यासाठीही महत्त्वाची मानली जाते. जर तुमच्या वाहनावर अजूनही HSRP बसवलेली नसेल, तर तुम्ही घरी बसून ऑनलाइन अर्ज करून ती मिळवू शकता. यासाठीच्या तीन प्रमुख ऑनलाइन मार्गांची माहिती खाली दिली आहे.
SIAM पोर्टलद्वारे अर्ज कसा कराल?
HSRP साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या (SIAM) अधिकृत वेबसाइटला भेट द्या. www.siam.in या वेबसाइटला भेट द्या.
'Services' मेनूमध्ये 'Book HSRP' या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा वाहन डीलर, उत्पादन जिल्हा आणि वाहन प्रकार निवडा.
प्लेट लावण्यासाठी अपॉइंटमेंट स्लॉट निवडा.
ऑनलाइन पेमेंट करून बुकिंग पूर्ण करा.
advertisement
Book My HSRP पोर्टलद्वारे प्रक्रिया
ही वेबसाईट देशभरात वापरली जाते आणि वापरण्यास सोपी आहे.
www.bookmyhsrp.com या पोर्टलवर जा.
High Security Registration Plate with Colour Sticker पर्याय निवडा.
Book वर क्लिक करा.
मोबाईल नंबर, वाहन क्रमांक आणि इतर माहिती भरा.
HSRP वितरणासाठी दोन पर्याय – केंद्रावर अपॉइंटमेंट किंवा होम डिलिव्हरी – यापैकी एक निवडा.
advertisement
सर्व माहिती तपासून पेमेंट करा.
जर तुम्ही होम डिलिव्हरी निवडली, तर जवळचे अधिकृत फिटमेंट सेंटर निवडावे लागेल.
महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवरून अर्ज कसा कराल?
महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी स्वतंत्र पोर्टल आहे:
transport.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालय निवडा – जसे MH 01 (मुंबई), MH 04 (ठाणे) इ.
Order Now वर क्लिक करा.
advertisement
वाहनाची सगळी माहिती भरा.
वितरणासाठी पद्धत व जवळचे फिटमेंट सेंटर निवडा.
तारीख व वेळ निवडून अंतिम पेमेंट करा.
HSRP साठी किती शुल्क लागते?
HSRP साठीचे दर वाहनाच्या प्रकारानुसार वेगवेगळे आहेत. बाईक आणि ट्रॅक्टरसाठी : 450 रुपये (GST वगळता)
कारसाठी : 745 रुपये (GST वगळता)
होम डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क:
दोन चाकी वाहनांसाठी : 125 रुपये
advertisement
चार चाकी वाहनांसाठी : 250 रुपये
HSRP संबंधित दर आणि नियम वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाइट्सवरून ताजी माहिती तपासणे आवश्यक आहे. कुठेही ऑनलाईन पेमेंट करण्याआधी ती साईट अधिकृत आहे की नाही ते तपासून घ्या. ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून अनेक फसवणुकीचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2025 10:20 AM IST