प्रत्येक Transactionवर Gold Coin मिळणार, भारतातील ग्राहकांसाठी गेमचेंजर ऑफर; रिवॉर्ड प्लॅन समजून घ्या
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Coins Program: Paytm ने आपल्या युझर्ससाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये दररोजच्या पेमेंट्सवर सोन्याची कमाई करता येणार आहे. या ‘गोल्ड कॉइन्स प्रोग्राम’मधून यूजर्सना प्रत्येक व्यवहारावर डिजिटल गोल्डच्या स्वरूपात रिवॉर्ड मिळणार आहे.
मुंबई: Paytm ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आणि आकर्षक योजना सुरू केली आहे. "गोल्ड कॉइन्स प्रोग्राम". या कार्यक्रमाअंतर्गत युझर्सना आता त्यांच्या दररोजच्या डिजिटल व्यवहारांवर ‘गोल्ड कॉइन्स’ (सोन्याचे नाणे) मिळणार आहेत. कंपनीच्या मते, ही योजना युझर्सना डिजिटल गोल्डच्या स्वरूपात हळूहळू बचत करण्याचा एक नवा मार्ग उपलब्ध करून देईल.
advertisement
गोल्ड कॉइन्स कसे मिळतील?
Paytm च्या या कार्यक्रमाअंतर्गत वापरकर्त्यांना विविध प्रकारच्या व्यवहारांवर गोल्ड कॉइन्स मिळतील. यात खालील गोष्टींचा समावेश आहे.
Scan & Pay (QR कोड स्कॅन करून पेमेंट)
advertisement
ऑनलाइन शॉपिंग
बिल पेमेंट्स
मोबाइल रिचार्ज
ऑटो पेमेंट्स
मनी ट्रान्सफर
याशिवाय UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे केलेले व्यवहारही या रिवॉर्ड प्रोग्राममध्ये गणले जातील. सर्वात खास गोष्ट म्हणजे जर युझर्स UPI द्वारे क्रेडिट कार्ड किंवा RuPay क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करतो, तर त्याला डबल गोल्ड कॉइन्स (दुप्पट सोन्याची नाणी) मिळतील.
advertisement
प्रत्येक व्यवहारावर वापरकर्त्याला त्याच्या व्यवहाराच्या रकमेच्या 1 टक्के मूल्याएवढे गोल्ड कॉइन्स दिले जातील. म्हणजेच जितकी जास्त पेमेंट्स केली जातील, तितकी अधिक सोन्याची नाणी मिळतील.
advertisement
गोल्ड कॉइन्स कसे रिडीम करायचे?
वापरकर्ते आपले गोल्ड कॉइन बॅलन्स Paytm अॅपच्या होम स्क्रीनवर असलेल्या “Gold Coins” विजेटमध्ये पाहू शकतात. जेव्हा एखाद्या वापरकर्त्याचा गोल्ड कॉइन बॅलन्स 1500 कॉइन्सपर्यंत पोहोचतो, तेव्हा तो हा बॅलन्स डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करू शकतो.
advertisement
कंपनीनं स्पष्ट केलं आहे की, प्रत्येक 100 गोल्ड कॉइन्सची किंमत 1 रुपयाच्या डिजिटल गोल्डएवढी असेल. म्हणजेच रोजच्या छोट्या व्यवहारांमधून सुद्धा वापरकर्ते सोन्याच्या स्वरूपात हळूहळू बचत करू शकतात.
Paytm चा उद्देश
Paytm ची ही नवीन योजना लहान व्यवहारांना गुंतवणुकीत बदलण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, ज्यांना आपल्या दैनंदिन खर्चातूनच थोडीफार बचत करायची आहे, त्यांच्यासाठी हा उपक्रम खास आहे. या उपक्रमाद्वारे Paytm डिजिटल पेमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंट यांचं एकत्रीकरण करत आहे. ज्यामुळे सामान्य वापरकर्त्यांनाही सोन्याच्या स्वरूपात गुंतवणुकीचा फायदा मिळू शकेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 10:47 PM IST
मराठी बातम्या/मनी/
प्रत्येक Transactionवर Gold Coin मिळणार, भारतातील ग्राहकांसाठी गेमचेंजर ऑफर; रिवॉर्ड प्लॅन समजून घ्या