Tata punch सारखी दिसायला सेम Car, आता कंपनीने नव्याने केली लाँच, किंमत 5 लाखांपासून!

Last Updated:

ही हॅचबॅक कार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस शोरूममध्ये पाहण्यास मिळेल. या कारची डिलेव्हरी सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल. 

News18
News18
भारतात सध्या बजेट फ्रेंडली कारची मोठी भाऊगर्दी झाली आहे. अशातच आता Citroen कंपनीने आपली  2025 Citroen C3 हॅचबॅक भारतात लाँच केली आहे. ही कार भारतात फक्त  5.23 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत आणली आहे. या सेगमेंटमध्ये ही कार सगळ्यात स्वस्त अशीच आहे. Citroen C3 चं हे  अपडेटेड व्हर्जन आहे. यामध्ये नवीन टॉप-एंड X ट्रिमचा समावेश आहे, जे ३ इंजन-गियरबॉक्स कॉर्डिनेशनसह आलं आहे. नवीन Citroen C3 ची बुकिंग अधिकृत डिलरशीपकडे ऑनलाईन सुरू झाली आहे.  ही हॅचबॅक कार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस शोरूममध्ये पाहण्यास मिळेल. या कारची डिलेव्हरी सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल.
Citroen C3 मध्ये  एंट्री-लेव्हल लाइव्ह व्हेरिएंट हे आधीच्या मॉडेलपेक्षा  98,000 रुपयांनी स्वस्त आहे.  तर फील व्हेरिएंटची किंमत 1.29 लाख रुपयांची कपात केली आहे. नवीन Citroen C3 मध्ये नवीन फील (O) ट्रिम चा समावेश केला आहे. या मॉडेलची किंमत 7.27 लाख रुपये आहे. सगळ्या  पेट्रोल व्हेरिएंट्सवर अतिरिक्त 93,000 रुपयांचा रेट्रोफिट CNG किट उपलब्ध आहे. X शाइन टर्बो-पेट्रोल व्हेरिएंट्समध्ये ड्यूल-टोन कलर ऑप्शन्स स्टँडर्ड आहे. तर X शाइन नॅचुरल एस्पिरेटेड व्हेरिएंटमध्ये ड्युल-टोन शेड अतिरिक्त 15,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
रंगाचा पर्याय 
2025 Citroen C3 मध्ये नवीन गार्नेड रेड रंगाचा समावेश केला आहे. जो सिंगल-टोन आणि ड्यूल-टोन (ब्लॅक रूफसह) दोन्ही पर्यायामध्ये  उपलब्ध आहे.  बाकी इतर कलर प्रकारामध्ये पोलर व्हाइट, प्लेटिनम ग्रे, कॉस्मो ब्लू, पेरला नेरा ब्लॅक  आणि पोलर व्हाइट रूफसह कॉस्मो ब्लू रंगाचा समावेश केला आहे.
advertisement
फिचर्स
नवीन 2025 Citroen C3 हॅचबॅकमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाही. पण, नवीन X शाइन ट्रिम प्रकारामध्ये टेलगेट वर ‘X’ बॅज दिला आहे. नवीन टॉप-अँड  व्हेरिएंट ऑटो डिमिंग IRVM, पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री आणि क्रूज़ कंट्रोलसह येतेय.सोबतच 360-डिग्री कॅमेराचा पर्याय दिला आहे. पण यासाठी तुम्हाला 25,000 रुपये मोजावे लागतील.  टॉप ट्रिम्स मॉडेलमध्ये लेदरट डॅशबोर्ड फिनिश आहे.  तर लाइव्ह आणि फिल व्हेरिएंट्समध्ये  क्रमशः ‘इंजेक्टेड ग्रे’ आणि ‘एनोडाइज्ड ग्रे’ प्लास्टिक फिनिश  दिलं आहे. या प्रकारामध्ये आवश्यक ते बदल करून ग्राहक किंमत कमी जास्त करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Tata punch सारखी दिसायला सेम Car, आता कंपनीने नव्याने केली लाँच, किंमत 5 लाखांपासून!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement