Car Driving Tips : क्लचचा योग्य वापर वाढवेल कारचं 30% मायलेज, कार मालकांनी लगेचच जाणून घ्या हे हॅक्स

Last Updated:

क्लच वापरण्याची पद्धत जर चुकीची असेल, तर त्याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजबरोबरच क्लच प्लेटच्या लाईफवरही होतो. त्यामुळे क्लचचा योग्य वापर तुमच्या गाडीचा मायलेज वाचवू शकतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : कार चालवणं ही आपल्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. मग ती ऑफिसला जाण्यासाठी असो, वीकेंड ट्रिपसाठी किंवा दैनंदिन कामांसाठी कार अनेकांसाठी कार रोजच्या जीवनाचा भाग झाली आहे. पण जेव्हा गाडी अपेक्षेप्रमाणे मायलेज देत नाही, तेव्हा मात्र त्रास होतो. अशावेळी काही जण वेगवेगळे जुगाड लावतात, पण त्यामुळे गाडीची कार्यक्षमता कमी होते आणि मायलेज आणखी घटते. यासाठी गाडी चालवताना काही सवयी आणि ड्रायव्हिंग स्टाईल सुधारणं आवश्यक असतं.
विशेषतः क्लच वापरण्याची पद्धत जर चुकीची असेल, तर त्याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजबरोबरच क्लच प्लेटच्या लाईफवरही होतो. त्यामुळे क्लचचा योग्य वापर तुमच्या गाडीचा मायलेज वाचवू शकतो.

क्लच वापराच्या चुकीच्या सवयी कोणत्या?

हाफ क्लचवर गाडी चालवणे – अनेकजण गाडी हळू चालवताना क्लच अर्धवट दाबून ठेवतात, ज्यामुळे क्लच प्लेट घासली जाते आणि मायलेज कमी होते.
advertisement
ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबणे - सतत क्लच वापरणंही प्लेट खराब करतं आणि इंधन जास्त खर्च होतं.
गाडी थांबवताना जोरात क्लच दाबणे - अचानक क्लच दाबल्यामुळे गाडीचे यंत्रणा असंतुलित होते.

मग नक्की काय करावं?

क्लचचा वापर फक्त 20 किमी/ता. पेक्षा कमी वेगात करा.
गिअर बदलतानाच क्लच वापरा, इतरवेळी टाळा.
गाडी थांबवताना आधी ब्रेक दाबा, मग क्लच वापरा.
advertisement
ट्रॅफिकमध्ये गाडी न्यूट्रलमध्ये ठेवा, अनावश्यक क्लच वापर टाळा.
हाफ क्लचचा वापर पूर्णपणे टाळा.
जर तुम्ही या सवयी सुधारल्या तर गाडीचं मायलेज तब्बल 30 टक्क्यांपर्यंत वाढवणं शक्य आहे आणि क्लच प्लेटही जास्त काळ टिकते. योग्य क्लच वापर हे मायलेज वाढवण्यासाठीचं मोठं शस्त्र ठरू शकतं.
मराठी बातम्या/ऑटो/
Car Driving Tips : क्लचचा योग्य वापर वाढवेल कारचं 30% मायलेज, कार मालकांनी लगेचच जाणून घ्या हे हॅक्स
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement