HSRP Update: तुमची एक चूक आणि 10,000 रुपये लागणार दंड, हाय सिक्योरिटी नंबर प्लेटवर महत्त्वाची अपडेट

Last Updated:

HSRP update: महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी ही प्लेट अनिवार्य आहे. नियम मोडल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

News18
News18
घरात दोन गाड्या आहेत, पण नंबर प्लेट अजूनही जुनी आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवून घेण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक राहीले आहेत. जर तुम्ही अजूनही आळस करत असाल किंवा नवीन नंबर प्लेट घेतली नसेल तर आताच अर्ज करा. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. महाराष्ट्र सरकार पुन्हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ करणार नाही. त्यामुळे 10 दिवसच शिल्लक राहिले आहेत.
महाराष्ट्रात सध्या वाहनधारकांकडून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्यात उशीर होत आहे. काही टाळाट करतात तर काहींना नंबर मिळत नाही अशी समस्या आहे. आता याचं गांभीर्य सरकारनं ओळखलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये RTO आणि पोलिसांची संयुक्त तपासणी मोहीम सुरू झाली आहे. रस्त्यांवर थांबवून गाड्यांची तपासणी केली जात आहे.
advertisement
तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. 10 दिवस शिल्लक आहेत. या 10 दिवसांत तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्या नाहीतर 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विशिष्ट नंबर प्लेट आहे. या नंबरप्लेटच्या मदतीनं सहज ट्रॅफिक पोलीस स्कॅन करुन संपूर्ण माहिती घेऊ शकतात. यूनिक कोड असलेली, सरकारी मान्यता प्राप्त, आणि वाहन चोरी टाळण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. केंद्र सरकारने 2019 पासून नवीन वाहनांकरता ही प्लेट बंधनकारक केली होती. पण आता जुन्या वाहनांनाही ती बसवून घेणं अनिवार्य केलं आहे.
advertisement
जर तुमचं वाहन 1 एप्रिल 2019 पूर्वी गाडी घेतलेलं असेल, आणि त्यावर अजून HSRP नाही, तर तुम्ही नियम मोडताय. आणि त्याचाच फटका दंडाच्या स्वरूपात बसू शकतो. 5000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. RTO मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून तुम्ही ही प्लेट ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला चार्जेस भरावे लागणार आहेत. तुमच्याकडे 30 जून शेवटची तारीख आहे. त्याआधी तुम्ही हे करुन घेणं आवश्यक आहेय
मराठी बातम्या/ऑटो/
HSRP Update: तुमची एक चूक आणि 10,000 रुपये लागणार दंड, हाय सिक्योरिटी नंबर प्लेटवर महत्त्वाची अपडेट
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement