आता Cab राईड कॅन्सल केली तर चालक आणि प्रवाशाला बसेल दंड, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

टॅक्सी चालक मनमानी पद्धतीने राईड रद्द करत असतात. प्रवासी या समस्येला कंटाळून गेले होते. परंतु आता या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन धोरण आणलं आहे.

News18
News18
मुंबई : महाराष्ट्र सरकारने अलीकडे वाहन धोरण जाहीर केलं आहे. त्याचपाठोपाठ मुंबईमध्ये एप टॅक्सीसेवा सुरू करणार आहे. पण महाराष्ट्रात बरेच अ‍ॅप-आधारित टॅक्सी चालक आहेत. हे टॅक्सी चालक मनमानी पद्धतीने राईड रद्द करत असतात. प्रवासी या समस्येला कंटाळून गेले होते. परंतु आता या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन धोरण आणलं आहे. त्यामुळे अशा चालकांच्या मनमानीला आता चाप लागणार आहे.
राज्य सरकारच्या  सुधारित अ‍ॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही वैध कारणाशिवाय ट्रिप रद्द करणाऱ्या कोणत्याही ड्रायव्हरला आता चांगलाच चाप बसणार आहे. प्रवाशांनाही या जबाबदारीतून सूट नाही. या धोरणाचा उद्देश म्हणजेच राज्यभरातील राइड-हेलिंग सेवांमध्ये अधिक शिस्त आणि विश्वासार्हता आणणे आहे.
चालक आणि ग्राहकाला इतका दंड
महाराष्ट्रात प्रत्येक अ‍ॅप-आधारित टॅक्सी चालकांकडून जर एखाद्या रायडरने कोणतेही कारण न देता बुक केलेली ट्रिप रद्द केली तर चालकाला राईड भाड्याच्या १०% दंड आकारला जाईल याची कमाल मर्यादा १०० रुपये इतकी असेल. आणि जर प्रवासानी ट्रिप रद्द केली तर त्यांना भाड्याच्या ५% दंड आकारला जाईल त्याची मर्यादा ५० रुपये इतकी असेल.
advertisement
ही मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेल्या व्यापक राष्ट्रीय चौकटीचा भाग आहेत. एकंदरीत या धोरणाचा उद्देश महाराष्ट्रात अॅप आधारित वाहतूक सुलभ करणे आहे. ज्यामध्ये अनपेक्षित रद्दीकरणे होणार नाहीत याकडे लक्ष दिल जात आहे.
अ‍ॅग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने काढलेल्या शासकीय आदेशातील मुद्दे :
  • चालकाने बुकिंग अ‍ॅपवर स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% मर्यादा 100 रुपये दंड भरावा लागेल
  • प्रवाशाने कारणाशिवाय बुकिंग रद्द केल्यानंतर ट्रिप रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 5% मर्यादा 50 रुपये दंड
  • अ‍ॅप आणि वेबसाइटसाठी सुरक्षा मानकं, रिअल-टाइम जीपीएस ट्रॅकिंग, इमर्जन्सी नंबर, चालकाची पार्श्वभूमी तपासणी आणि प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आलं आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे.
advertisement
दरम्यान, लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.  शासनाचा हा चांगला निर्णय आहे. हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. पण उशीर जरी झाला असला तरी चांगला निर्णय आहे. ड्राइव्हर कॅन्सल करतात सहज ट्रिप त्यांना जवळच भाडं नको असतं त्यामुळे त्यांना आता दंड भराव लागणार आहे ही चांगली गोष्ट आहे. चालकाला ही कळेल राईड कॅन्सल केल्याचा परिणाम काय असतो.  प्रवाशांकडून पण दंड घेतलं जाईल हे पण चांगलं आहे, कुणाचं नुकसान नको व्हायल. प्रवासी पण कॅन्सल करतात अचानक राईड त्यामुळे हे पण ठीक आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईतील प्रवाशांनी दिली.
मराठी बातम्या/ऑटो/
आता Cab राईड कॅन्सल केली तर चालक आणि प्रवाशाला बसेल दंड, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement