10 लाखां खालील मारुती कार्स स्वस्त; GST घटल्यानंतर 3.49 लाखांपासून सुरुवात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता मारुतीच्या अनेक मॉडेल्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.49 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. म्हणजेच 10 लाखांखालील अनेक गाड्या ग्राहकांना स्वस्तात मिळणार आहेत. पाहा कोणत्या कार किती स्वस्त झाल्या आहेत
मुंबई : भारतात कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारच्या करप्रणालीतील बदल थेट ग्राहकांवर परिणाम करतात. GST दरात घट झाल्यामुळे आता कार्सच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. देशातील सर्वात मोठा कार उत्पादक मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय कार्सच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत.
आता मारुतीच्या अनेक मॉडेल्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.49 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. म्हणजेच 10 लाखांखालील अनेक गाड्या ग्राहकांना स्वस्तात मिळणार आहेत. पाहा कोणत्या कार किती स्वस्त झाल्या आहेत
मारुती एस-प्रेसो
एंट्री लेव्हल कार एस-प्रेसो तब्बल 1.30 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता या कारची सुरुवातीची किंमत फक्त 3.49 लाख रुपये आहे.
advertisement
मारुती ऑल्टो K10
सामान्य माणसाची कार मानली जाणारी ऑल्टो K10 आता 1.08 लाख रुपयांनी स्वस्त झाली असून तिची किंमत फक्त 3.69 लाख रुपयेपासून सुरू होते.
मारुती सिलेरियो
बजेट हॅचबॅक सिलेरियो आता 94,100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तिची नवीन किंमत 4.69 लाख रुपयेपासून सुरू.
मारुती वैगनआर
सर्वाधिक लोकप्रिय कुटुंब कार वैगनआर 79,600 रुपयांनी स्वस्त झाली आहे. नवीन किंमत फक्त 4.97 लाख रुपये.
advertisement
मारुती इग्निस
नेक्सा डीलरशिपमधून मिळणारी इग्निस हॅचबॅक आता 71,300 रुपयांनी स्वस्त झाली असून तिची किंमत 5.35 लाख रुपयेपासून सुरू.
मारुती स्विफ्ट
हॉट हॅचबॅक स्विफ्ट आता 84,600 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तिची सुरुवातीची किंमत 5.78 लाख रुपये आहे.
मारुती बलेनो
प्रीमियम हॅचबॅक बलेनोची किंमत 86,100 रुपयांनी कमी झाली असून तिची नवीन किंमत 5.98 लाख रुपये आहे.
advertisement
मारुती ईको
फॅमिली वॅन ईको 68,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तिची सुरुवातीची किंमत 5.18 लाख रुपये आहे.
मारुती डिजायर
लोकप्रिय सेडान डिजायर आता 87,700 रुपयांनी स्वस्त झाली असून तिची किंमत 6.25 लाख रुपयेपासून सुरू होते.
मारुती डिजायर टूर S
टूर S मॉडेलची किंमत 67,200 रुपयांनी कमी झाली आहे. आता ती फक्त 6.23 लाख रुपये आहे.
advertisement
मारुती फ्रॉन्क्स
धमाकेदार क्रॉसओव्हर फ्रॉन्क्स 1.12 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. तिची सुरुवातीची किंमत 6.84 लाख रुपये.
मारुती ब्रेजा
टॉप सेलिंग SUV ब्रेजा तब्बल 1.13 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता ती फक्त 8.25 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे.
मारुती अर्टिगा
सर्वाधिक विक्री होणारी 7 सीटर MPV अर्टिगा 46,400 रुपयांनी स्वस्त झाली असून तिची किंमत 8.80 लाख रुपयेपासून सुरू आहे.
advertisement
थोडक्यात, GST मध्ये घट झाल्यामुळे मारुती सुझुकीच्या कार्सच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. आता ग्राहकांना 10 लाखांखालील बजेटमध्ये हॅचबॅकपासून SUV आणि MPV पर्यंत स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 7:23 PM IST