ओला-उबरनं फिरायची वेळ संपली! दसऱ्याला स्वस्तात घरी घेऊन या Maruti Suzukiची ही कार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मारुती सुझुकी सेलेरिओच्या किमती GST कपातमुळे 59,000 ते 94,000 रुपयांनी कमी झाल्या आहेत. मायलेज, फीचर्स आणि रंगांच्या पर्यायांसह दिवाळीत उत्तम ऑफर्स उपलब्ध.
मारुती सुझुकीची लोकप्रिय छोटी हॅचबॅक कार सेलेरिओ खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! जीएसटी (GST) दरात केलेल्या कपातीमुळे या गाडीच्या किमतीत मोठी घट झाली आहे, ज्यामुळे ती आता खूपच परवडणारी झाली आहे. एंट्री-लेव्हल अल्टो K10 नको असलेल्या पण छोटी आणि किफायती कार हवी असलेल्या ग्राहकांना आता सेलेरिओ एक उत्तम पर्याय ठरू शकते.
GST च्या दरात कपात झाल्यानंतर 22 सप्टेंबरपासून कारच्या किंमती कमी झाल्या. त्याच दरम्यान कंपनीने कार 94 हजार रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी आणि दसऱ्याला तुम्ही कंपनीच्या आणखी ऑफर्सचा फायदा घेऊन स्वस्तात कार घरी आणू शकता. कंपनीच्या दाव्यानुसार येत्या काही महिन्यांत सेलेरिओच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
व्हेरियंटनुसार 94000 रुपयांपर्यंत कपात
मारुती सुझुकी सेलेरिओच्या विविध व्हेरियंटच्या किमतीत 59,000 रुपयांपासून ते 94,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. सर्वाधिक कपात बेस व्हेरियंटवर करण्यात आली आहे. जीएसटी दरातील सुधारणेनंतर सेलेरिओच्या LXi बेस व्हेरियंट मॉडेलच्या किमतीत सर्वाधिक 94000 रुपयांची कपात केली आहे. सर्वात कमी कपात ही ZXi Plus MT या टॉप व्हेरियंटच्या किमतीत 59,000 रुपयांची कपात केली आहे.
advertisement
या कारच्या मॅन्युअल व्हेरियंटच्या किमतीत 59,000 रुपयांपासून ते 94,000 रुपयांपर्यंत आणि AMT (ऑटोमॅटिक) व्हेरियंटच्या किमतीत 66000 ते 89,000 रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

मायलेजचा बादशाह आणि दमदार फीचर्स
काही वर्षांपूर्वीच मारुती सुझुकीने सेलेरिओला पूर्णपणे नवीन डिझाइन आणि अनेक आधुनिक फीचर्ससह बाजारात आणले होते. इंजिन आणि मायलेज यासाठी ही गाडी बाप आहे. या हॅचबॅकमध्ये 1.0-लिटरचे नॅचरली एस्पिरेटेड थ्री-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन 25.24 किमी/लीटर ते 26.68 KMPL इतके उत्कृष्ट मायलेज देते.
advertisement
सीएनजी (CNG) व्हेरियंट तर 34.43 किमी/किलो पर्यंत मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. फीचर्ससोबत रंगाचा विचार केला तर सेलेरिओ सध्या Speedy Blue, Glistening Grey, Arctic White, Silky Silver, Solid Fire Red, Caffeine Brown आणि Pearl Bluish Black यांसारख्या आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 2:11 PM IST