मायलेजमध्ये Maruti चा कुणीच पकडू शकणार नाही हात! आणतेय flex fuel स्पेशल SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
आधीच मारुतीच्या गाड्यांचं मायलेज हे सर्वाधिक आहे. त्यात आता मारूतीने फ्लेक्स फ्युलवर चालणारी कार आणत आहे, त्यामुळे
केंद्र सरकारने एकीकडे इथेनॉल अर्थात E20 आणलं आहे. पण E20 मिश्रित पेट्रोल वापरण्यावरून बराच वाद सुरू आहे. अशातच भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुतीने Maruti Fronx flex fuel Edition लाँच करणार आहे. २९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या २०२५ जपान मोबिलिटी शोमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेजवर आणणार आहे. या कारच्या डिझाईनमध्ये बराच बदल करण्यात आला आहे.
Maruti Fronx flex fuel Edition च्या डिझाईनमध्ये बदल केला आहे. कारचं हुड, दरवाजे आणि साइड प्रोफाइलवरील पिवळे स्टिकर्स आणि ग्राफिक्स. कॉम्पॅक्ट क्रॉसओवरमध्ये समान स्पोर्टी फ्रंट आणि रियर बंपर, फॉक्स स्किड प्लेट्स आणि क्रोम डिटेलिंग, काळे १७-इंच मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, स्प्लिट हेडलॅम्प, जाड काळे क्लॅडिंग दिले आहे. आधीच मारुतीच्या गाड्यांचं मायलेज हे सर्वाधिक आहे. त्यात आता मारूतीने फ्लेक्स फ्युलवर चालणारी कार आणत आहे, त्यामुळे ही कार साधारपणे 23 किमी पेक्षा जास्त मायलेज देण्याची शक्यता आहे.
advertisement
इंजिन कसं आहे?
Maruti Fronx flex fuel Edition ही फ्लेक्स फ्युएलवर चालणारी गाडी आहे. पण कंपनीने अधिकृतपणे इंजिन स्पेसिफिकेशन जाहीर केलं नाही. पण, मारुती सुझुकीची १.२ लीटर आणि १.५ लीटर इंजिन फ्लेक्स-फ्युएल जुळतं आहेत आणि यापैकी एक इंजिन फ्रॉन्क्सला पॉवर देऊ शकतं. मारुती सुझुकीने पुष्टी केली आहे की, त्यांचे पहिले फ्लेक्स-फ्युएल वाहन (FFV) मार्च २०२६ पर्यंत भारतात लाँच होईल. मारुती वॅगनआर फ्लेक्स फ्युएल (जे २०२३ ऑटो एक्स्पो आणि २०२४ इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये पाहण्यास मिळणार आहे किंवा फ्रॉन्क्स फ्लेक्स फ्युएल असू शकतं.
advertisement
स्ट्रॉन्ग हायब्रिड पॉवरट्रेन
Maruti लवकरच Fronx चं हायब्रिड व्हर्जनही लाँच करणार आहे. फ्रॉन्क्स कॉम्पॅक्ट क्रॉसओवरला स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेनसह लाँच करण्याच्या तयारीत आहे. मारुतीने स्वत: हायब्रिड टेक्नालॉजी तयार करत आहे.. आतापर्यंत मारुती सुझुकीही टोयोटा कंपनीकडून हायब्रिड टेक्नालॉजीचा वापर करत असते. आता मारुतीच्या नवीन स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेनमुळे ३५ किमी प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज मिळण्याची शक्यता आहे. या कारमध्ये १.२ लीटर, ३-सिलेंडर झेड-सिरीज पेट्रोल इंजिन असणार आहे.
advertisement
दरम्यान, Fronx हायब्रिडची चाचणी सुरू झाली आहे. फ्रॉन्क्स हायब्रिड चाचणी म्यूलपैकी एकाला LiDAR (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग) सेन्सरसह चाचणी करताना आढळलं आहे, जे ADAS (ऑटोनोमस ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) फिचर्ससह आहे. या कारवर 'हायब्रिड' बॅज देखील आहे. लवकरच ही Fronx हायब्रिड कार लाँच होणार आहे.
फ्लेक्स फ्यूल म्हणजे काय?
view commentsफ्लेक्स फ्यूल (Flexible Fuel) म्हणजे एक असे इंधन मिश्रण जे एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनांना वापरण्याची लवचिकता देते. हे विशेषतः पेट्रोल (गॅसोलीन) आणि बायो-इथेनॉल (Bio-Ethanol) किंवा बायो-मेथेनॉल च्या मिश्रणाला दिलेले नाव आहे. फ्लेक्स फ्यूलसाठी डिझाइन केलेले इंजिन (ज्याला फ्लेक्स फ्यूल व्हेईकल - FFV म्हणतात) एकाच वेळी पेट्रोल, इथेनॉल किंवा या दोन्हीच्या कोणत्याही मिश्रणावर (उदा. E20 - 20% इथेनॉल, 80% पेट्रोल किंवा E85 - 85% इथेनॉल, 15% पेट्रोल) चालण्यास सक्षम असते. हे इथेनॉल हे कृषी उत्पादनांपासून (उदा. ऊस, मका) तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला नवीन आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 7:12 PM IST