Tata Altroz CNG: टाटाची टँकसारखी CNG कार, नव्या Altroz चं मायलेज पाहून सगळेच अवाक्

Last Updated:

आधीच्या Altroz पेक्षा नवीन Altroz ही पूर्णपणे वेगळी आहे. या कारची किंमतही कमी आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्येही ही कार लाँच केली आहे

News18
News18
टाटा मोटर्सने अलीकडे आपली दमदार अशी Altroz कार नव्या रुपात लाँच केली आहे. आधीच्या Altroz पेक्षा नवीन Altroz ही पूर्णपणे वेगळी आहे. या कारची किंमतही कमी आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्येही ही कार लाँच केली आहे. या कारची मायलेज टेस्ट घेण्यात आली तेव्हा आश्चर्यकारक आकडे समोर आले आहे. विशेष म्हणजे, Altroz ची टक्कर थेट मारुती सुझुकी बलेनोशी आहे. पण मायलेजच्या तुलनेत बलेनोपेक्षा सरस ठरली आहे.
Tata Altroz CNG ची मायलेज टेस्ट घेण्यात आली.  एक किलो सीएनजीमध्ये या कारने तब्बल 26.90 किमी मायलेज दिलंय.  CNG मॉडलची किंमत 7.89 लाख रुपयांपासून सुरू होते. हे मायलेज चांगलं जरी असलं तरी मारुती सुझुकी आणि टोयोटा ग्लांजा सीएनजी व्हेरिएंटचं मायलेज हे ३० किमी किलोग्राम इतकं आहे. पण बलेनोच्या तुलनेत Tata Altroz CNG अधिक प्रीमियम आणि मजबूत आहे. नवीन अल्ट्रोज सीएनजी व्हेरिएंट्समध्ये1.2-लिटर, 3-सिलेंडर इंजिन दिलं आहे. सीएनजीमध्ये ही कार 73.5 पीएस इतकी पॉवर आणि 103 एनएमचा टार्क जनरेट करतो.
advertisement
सीएनजीवर होते डायरेक्ट सुरू
अल्ट्रोज़ सीएनजी  व्हेरिएंट्समध्ये फक्त 5-स्पीड म्यॅनुअल गियरबॉक्स दिला आहे. बलेनो CNG ची एक्स-शोरुम किंमत 8.44 लाख रुपयांपासून सुरू होते. अशातच Altroz CNG व्हॅल्यू फॉर मनी कार ठरली आहे. ही कार डायरेक्ट CNG मोडवर सुद्धा सुरू होऊ शकते. या कारसाठी 5 कलर ऑप्शन दिला आहे.  ज्यामध्ये Dune Glow, Ember Glow, Royal Blue, Pure Grey आणि white कलर आहे.
advertisement
210 लिटर बूट स्पेस
Altroz CNG मध्ये 210 लिटर इतका मागे बूट स्पेस दिला आहे. जो बऱ्यापैकी चांगला आहे. यामध्ये तुम्ही ३ ते ४ बॅग सहज ठेवू शकतात.   सेफ्टीच्या तुलनेत या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ESP, सनरूफ, 3 पॉइंट सीट बेल्ट, 16 इंचाचे टायर्स, डिस्क ब्रेक्स आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फिचर्स दिले आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Tata Altroz CNG: टाटाची टँकसारखी CNG कार, नव्या Altroz चं मायलेज पाहून सगळेच अवाक्
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement