मिडल क्लासची Maruti Suzuki आता नव्या रुपात, पहिल्या EV ला पीएम मोदींनी दाखवला झेंडा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मारुती सुझुकीची e-VITARA EV कार पीएम मोदींनी हंसलपूरमध्ये लोकार्पण केली, 100 देशांत निर्यात होणार. टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्रकल्पाचंही उद्घाटन.
मुंबई: सेकंड हॅण्ड कार नको पण मोठं बजेटही नाही, नवी कोरी हवी पण फॅमिलिसाठी कन्फर्ट हवा या सगळ्याचा विचार केला तर मिडल क्लास माणसाचं कारचं स्वप्न पूर्ण करणारी मारुती सुझुकी कंपनी, या कंपनीने नवीन कोरी EV कार लाँच केली आहे. पीएम मोदींनी या कारला झेंडा दाखवून पीएम मोदींनी लोकार्पण केलं. ही गाडी मार्केटमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार असं सांगितलं जात आहे.
अहमदाबादमधील हंसलपूर इथे मारुती सुझुकी प्लँटमध्ये पीएम मोदींनी या गाडीला झेंडा दाखवला. आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. पहिल्या बॅचचं प्रोडक्शन सुरू झालं आहे. SUV_e-VITARA कारला पीएम मोदींनी आज झेंडा दाखवला. पीएम मोदींनी आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करुन माहिती दिली. SUV फक्त भारतातच नाही तर जपान आणि युरोपसह 100 देशांमध्ये एक्सपोर्ट करणार आहेत.
advertisement
Today is a special day in India’s quest for self-reliance and being a hub for green mobility. At the programme in Hansalpur, e-VITARA will be flagged off. This Battery Electric Vehicle (BEV) is made in India and will be exported to over a hundred nations. In a big boost to our…
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2025
advertisement
भारताला आत्मनिर्भर आणि 'ग्रीन मोबिलिटी हब' बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. हसलापूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार झालेल्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हीकल (BEV) e-VITARA ला हिरवा झेंडा दाखवला. हे वाहन 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केले जाणार आहे.
पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले, "भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि ग्रीन मोबिलिटी हब बनण्याच्या दिशेने आजचा दिवस खूप खास आहे. हंसलापूर येथील कार्यक्रमादरम्यान e-VITARA ला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. हे वाहन भारतात बनले असून, 100 हून अधिक देशांत निर्यात केले जाईल.
advertisement
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्रकल्पाचेही उद्घाटन केले. हे तोशिबा, डेंसो आणि सुझुकी यांचा एकत्रित कार्यक्रम आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आता 80 टक्क्यांहून अधिक बॅटरीचे उत्पादन भारतातच केले जाईल. हा प्रकल्प भारताच्या बॅटरी इकोसिस्टमसाठी मोठं प्रोत्सहन मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी प्लांटमधून कारने भरलेल्या मालगाडी सेवेलाही हिरवा झेंडा दाखवला. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्लांटमधून दररोज सरासरी 600 गाड्यांची वाहतूक करणाऱ्या तीन मालगाड्या सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे देशाच्या उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती होईल आणि रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
view commentsLocation :
Gujarat
First Published :
August 26, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
मिडल क्लासची Maruti Suzuki आता नव्या रुपात, पहिल्या EV ला पीएम मोदींनी दाखवला झेंडा


