RTO चा नवीन नियम, आता तुमचं वाहन आधार आणि मोबाईल क्रमांकाशी करावे लागेल लिंक, ही आहे वेबसाईट!

Last Updated:

केंद्रीय मार्ग परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने  ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्टर्ड वाहनांच्या मालकांसाठी नवीन सुविधा आणणार आहे.

News18
News18
सरकारी काम तीन महिने थांब, हा नियम कोणत्याही सरकारी कार्यालयात पाहण्यास मिळतो. जर आरटीओ कार्यालय असेल तर मग सारख्या चक्करा माराव्या लागतात. पण आता तुमचा वेळ वाचणार आहे. कारण, केंद्रीय मार्ग परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने  ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्टर्ड वाहनांच्या मालकांसाठी नवीन सुविधा आणणार आहे. ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या मोबाईल क्रमांक हा ड्रायव्हिंग लाइसन्स किंवा RC बूकशी लिंक करू शकतो. त्यामुळे तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला parivahan.gov.in च्या साइटवर जाऊनऑथेंटिकेशनच्या मदतीने मोबाईल क्रमांक लिंक करता येईल.
केंद्रीय मार्ग परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने वाहन मालक आणि ड्रायव्हिंग लायसन्सधारकांसाठी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.  यामध्ये  ज्या लोकांना आपल्या वाहनाचं आधार ऑथेंटिकेशन प्रक्रियेचा वापर करून मोबाईल क्रमांक लिंक करता येईल आणि अपडेट ही करता येईल.  यासाठी तुम्हाला parivahan.gov.in वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल.  या पोर्टलवर दोन वेगवेगळे  QR कोड उपलब्ध आहे. एक वाहनासाठी आणि दुसरं ड्रायव्हरसाठी. या QR कोडला  स्कॅन करून तुम्ही सहज तुमचा मोबाइल नंबर अपडेट करू शकतात.
advertisement
RC कसं अपडेट करायचं?
जर तुम्हाला RC अपडेट करायचं असेल तर  parivahan.gov.in वेबसाईटवर लॉग इन करायचं. या ठिकाणी   मोबाईल नंबर अपडेट करणाऱ्या ऑप्शनला सलेक्ट करावं लागेल. त्यानंतर  तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, आणि इंजिन नंबर सगळं भरावं लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशनची  तारीख आणि व्हेलिडिटी सांगावे लागेल. त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड लागेल, त्यानंतर तुमच्या क्रमांक लिंक होईल.
advertisement
ड्रायव्हिंग लायन्सस कसं अपडेट करायचं? 
जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायन्सस अपडेट करायचं असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला पोर्टल वर सारथी QR कोड स्कॅन करावा लागेल. त्याच्याशी संबंधित पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती भरावी लागेल. सोबतच तुम्हाला तुम्हाला तुमची जन्मतारीख, राज्याचं नाव आणि कॅप्चा कोड नीट भरावा लागेल. तुम्ही ही सगळी माहिती भरल्यावर सबमिट करावं लागेल.
मराठी बातम्या/ऑटो/
RTO चा नवीन नियम, आता तुमचं वाहन आधार आणि मोबाईल क्रमांकाशी करावे लागेल लिंक, ही आहे वेबसाईट!
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement