Suzuki ने टाकला मोठा डाव, आणली हायटेक स्कुटर, फिचर्स पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:

मागील काही वर्षांपासून  सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रा. लिमिटेड (SMIPL) आपली suzuki ने मार्केटमध्ये दबदबा कायम राखला आहे. आता सुझुकीने  अॅक्सेसचं नवीन मॉडेल लाँच केलं आहे. 

News18
News18
बाइकपेक्षा स्कुटर खरेदीकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. मागील काही वर्षांपासून  सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रा. लिमिटेड (SMIPL) आपली suzuki ने मार्केटमध्ये दबदबा कायम राखला आहे. आता सुझुकीने  अॅक्सेसचं नवीन मॉडेल लाँच केलं आहे.  या नव्या  suzuki access  मध्ये राइड कनेक्ट टीएफटी एडिशनमध्ये ब्लूटूथ-कलर टीएफटी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीन पर्ल मॅट अ‍ॅक्वा सिल्व्हर कलर ऑप्शन दिला आहे.
नवीन suzuki access मध्ये ४.२-इंचाचा थिन-फिल्म ट्रान्झिस्टर (TFT) डिस्प्ले दिला आहे. रायडर्सना एक स्पष्ट, उच्च-कॉन्ट्रास्ट इंटरफेस देतो जो वाढीव ब्राइटनेस आणि स्पष्टतेसह आवश्यक राइड माहिती देण्यास मदत करतो. ज्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत दृश्यमानता सुनिश्चित होते. जलद रिफ्रेश रेट आणि अचूक रंगासह, क्लस्टर कार्यक्षमता आणि दृश्य आकर्षण दोन्ही वाढवतं.
सुझुकीची राइड कनेक्ट नेमकं काय?
advertisement
राइड कनेक्ट टीएफटी एडिशनमध्ये सुझुकीची राइड कनेक्ट तंत्रज्ञान देखील आहे, जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सक्षम करते. पर्ल मॅट अ‍ॅक्वा सिल्व्हर रंगाच्या समावेशामुळे स्कूटरचे रंग पर्याय पाच पर्यंत वाढला आहे. ज्यामध्ये मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर २, मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू, पर्ल ग्रेस व्हाइट आणि सॉलिड आइस ग्रीन यांचा समावेश आहे. अ‍ॅक्सेस १२५ टीएफटी मॉडेल डिझाइन आणि मेकॅनिकल सेटअपसह कायम आहे. जे अजूनही १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनसाठी बेस्ट आहे. हे इंजिन ६,५०० आरपीएम वर ८.३ बीएचपी पॉवर आणि ५,००० आरपीएम वर १०.२ एनएम पीक टॉर्क निर्माण करतं.
advertisement
"सुझुकी अॅक्सेस हा शहरी भागातील ग्राहकांचा अनेक वर्षांपासून एक विश्वासार्ह साथीदार राहिला आहे आणि त्यामुळेच  नवीन अपग्रेडसह, आम्ही आधुनिक कार्यक्षमता आणि आकर्षणाचा एक नवीन भर दिला आहे.. रंगीत TFT डिजिटल डिस्प्ले आणि नवीन रंग स्कूटरची विश्वासार्हता, आराम आणि कार्यक्षमता या ताकदी कायम ठेवत दररोजच्या रायडिंग अनुभवात वाढ करतात." अशी प्रतिक्रिया सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रा. लि. चे सेलेस मॅनेजर दीपक मुत्रेजा यांनी दिली. नवीन अ‍ॅक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशनची किंमत १,०१,९०० (एक्स-शोरूम दिल्ली) आहे आणि ती आता देशभरातील सर्व सुझुकी मोटरसायकल इंडिया डीलरशिपवर उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Suzuki ने टाकला मोठा डाव, आणली हायटेक स्कुटर, फिचर्स पाहून पडाल प्रेमात!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement