Tata चा मोठा धमाका, टँकसारख्या रेसर कारवर बुलेट घेता येईल इतका डिस्काउंट, लूकही कडक

Last Updated:

टाटा मोटर्सने मे महिन्यात नवीन Altroz लाँच करून एकच धमाका उडवून दिला. नव्या Altroz मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे

News18
News18
टाटा मोटर्सने मे महिन्यात नवीन Altroz लाँच करून एकच धमाका उडवून दिला. नव्या Altroz मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. बाहेरील डिझाइन आणि इंटरिअरमध्ये अनेक असे बदल करण्यात आले असून अनेक नवे फिचर्स दिले आहे. पण नव्या Altroz मध्ये शक्तिशाली टर्बो इंजिन दिलं नाही. जर तुम्हाला Altroz सीरिजमध्येच पॉवर फुल इंजिनवाली Altroz खरेदी करायची असेल तर आता Altroz रेसरवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
टाटा मोटर्सने अलीकडेच Altroz फेसलिफ्ट लाँच केली आहे. यामध्ये नवीन डिझाइन आणि फिचर्स दिले आहेत. पण  शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन दिलं नाही. आधीच्या Altroz ने रेसर एडिशन लाँच केली होती. यामध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजन (118bhp आणि 170Nm) इतकं होतं. तर हेच इंजिन टाटा नेक्सॉनला सुद्धा पॉवर देतंय. कंपनीने Altroz रेसरचे 3 व्हेरिएंट्स  R1, R2 आणि R लाँच केले होते.
advertisement
रेसर अल्ट्रोज मॉडेलवर डिस्काउंट
दरम्यान, दमदार इंजिन आणि रेसर एडिशन असून Altroz ने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करू शकली नाही.  पण तरीही ही दमदार कार टाटाने मार्केटमधून बाजूला केली नाही. आता जुन्या Altroz रेसिंग एडिशनवर MY2024 मॉडेल्सवर कंपनीने तब्बल 1.40 लाख रुपयांची सूट दिली आहे.  ही एक दमदार अशी कार आहे, या  कारमध्ये व्हेंटिलेटेड सिट्स सुद्धा आहे.
advertisement
इंजिन आणि पॉवर
टर्बो पेट्रोल इंजिनशिवाय Altroz मध्ये 1.2-लिटर NA पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय दिला आहे. मुळात,  पेट्रोल इंजिनमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिला असून  AMT आणि DCA सह आहे. सोबतच, भारतातील ही एकमेव हॅचबॅक कार आहे, जी ड्राईव्ह डिझेल इंजिन देते. या कारमध्ये  एलईडी हेडलॅप्स, 10.25-इंच टचस्क्रीन सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, टच-बेस्ड एसी कंट्रोल्स आणि आणखी दमदार असे फिचर्स दिले आहे. Altroz फेसलिफ्टची किंमत मुंबईमध्ये ऑन-रोड 8.13 लाख रुपयांपासून सुरू होते ती 13.68 लाख रुपयांपर्यंत आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Tata चा मोठा धमाका, टँकसारख्या रेसर कारवर बुलेट घेता येईल इतका डिस्काउंट, लूकही कडक
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement