Tata म्हणजे लोखंडच! सप्टेंबरमध्ये केला नवीन रेकॉर्ड, भारतात पटकावला दुसरा क्रमांक!

Last Updated:

टाटा मोटर्सने महिंद्रा अँड महिंद्रा आणि ह्युंदाई मोटर इंडिया सारख्या स्पर्धकांना मागे टाकलं आहे.

News18
News18
केंद्र सरकारने  वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीच्या दरात कपात केली आहे. २२ सप्टेंबरपासून सर्वच क्षेत्रातील वस्तूचे दर कमी झाले आहे. त्यानंतर नवरात्री आणि दसऱ्या निमित्ताने वाहन विक्रीमध्ये चांगलीच संधी चालून आली आहे. सप्टेंबर महिना हा ऑटो इंडस्ट्रीसाठी फायद्याचा ठरला आहे. सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विक्रमी विक्री केली आहे. यामध्ये भारतीय कार आणि वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने पुन्हा एकदा रेकॉर्ड केला आहे. टाटा मोटर्सने महिंद्रा अँड महिंद्रा आणि ह्युंदाई मोटर इंडिया सारख्या स्पर्धकांना मागे टाकलं आहे.
टाटा मोटर्स वाहन विक्रीच्या बाबतीत देशभरात दुसऱ्या स्थानावर आहे तर मारुती सुझुकी इंडियानं पहिलं स्थान कायम राखलं आहे. टाटाने सप्टेंबरमध्ये ४०,५९४ युनिट्स विकले  आहे. वाहन पोर्टलवरील अधिकृत आकडेवारीनुसार, टाटाच्या पीव्ही नोंदणी, ज्यामध्ये इलेक्ट्रिक मॉडेल्सचाही समावेश आहे.
भारतात सध्या वाहन उत्पादक कंपन्यामध्ये चांगलीच स्पर्धा आहे. पण, भारतीय कंपन्या टाटा मोटर्स, महिंद्रा आणि मारुती आपली गड राखून आहे. सप्टेंबर महिन्यात महिंद्रा (३७,०१५ युनिट्स) आणि ह्युंदाई (३५,४४३ युनिट्स) पेक्षा जास्त विक्री केली होती. मारुतीच्या पीव्ही नोंदणी महिन्यात १,२२,२७८ युनिट्सवर होत्या.
advertisement
नवरात्र आणि दसऱ्याची ऑफर
नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर टाटाने इंधनावर धावणाऱ्या मॉडेल्सच्या किंमती १,५५,००० रुपयांपर्यंत स्वस्त झाल्यात. कंपनीने सप्टेंबर २०२५ मध्ये ६५,००० रुपयांपर्यंतच्या फेस्टिव्ह ऑफरची घोषणा देखील केली होती. ही कपात एक्स-शोरूम किंमतीवर आहे. टाटाच्या ICE मॉडेल्समध्ये Tiago हॅचबॅक, Altroz ​​हॅचबॅक आणि Tigor सेडानचा समावेश आहे. त्यांच्या ICE SUV मध्ये Punch, Nexon, Curve, Harrier आणि Safari यांचा समावेश आहे. Altroz ​​आणि Tigor स्वस्त झाल्या आहेत.
advertisement
टाटाच्या गाड्या किती स्वस्त?
नवीन GST दरांनंतर Tiago ची किंमत ७५,००० रुपयांपर्यंत, Altroz ​​ची किंमत १,११,००० रुपयांपर्यंत आणि Tigor ची किंमत ८१,००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. Punch ची किंमत १,०८,००० रुपयांपर्यंत आणि Nexon ची किंमत १,५५,००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. Curve, Harrier आणि Safari ची किंमत ही ६७,००० रुपयांपर्यंत आणि १,४४,००० रुपयांपर्यंत आणि १,४८,००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
advertisement
या गाड्याही स्वस्त 
टाटा कंपनीने ईव्ही सेगमेंटमध्येही Tiago.ev, Tigor.ev, Punch.ev, Nexon.ev, Curve.ev आणि Harrier.ev सारखी इलेक्ट्रिक वाहनं (EVs) देखील देते. GST 2.0 पद्धतीमध्ये मारुतीने त्यांच्या ICE कारच्या किमती 1,29,600 पर्यंत, महिंद्राने 1,56,000 पर्यंत आणि Hyundai ने 2,40,000 पर्यंत कमी केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Tata म्हणजे लोखंडच! सप्टेंबरमध्ये केला नवीन रेकॉर्ड, भारतात पटकावला दुसरा क्रमांक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement