Ultraviolette: फक्त 999 रुपयांमध्ये बूक करा सुपर EV Bike, रेंज 323 किमी, 0-100 फक्त 8 सेकंदात!

Last Updated:

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रीमियम इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड Ultraviolette ने भारतात आपली नवीन X47 Crossover बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक टेक्नालॉजी आणि फिचर्सने अत्यंत बेस्ट अशी बाईक आहे.

News18
News18
जीएसटीच्या कर रचनेत बदल झाल्यामुळे सर्वत्र खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये दुचाकी आणि कार खरेदीसाठी शो रूमला गर्दी होत आहे. अशातच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रीमियम इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड Ultraviolette ने भारतात आपली नवीन X47 Crossover बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक टेक्नालॉजी आणि फिचर्सने अत्यंत बेस्ट अशी बाईक आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर 999 रुपयांमध्ये ऑनलाईन बुकिंग सुरू केली आहे.
X47 Crossover, नावाप्रमाणेच एक एडव्हेंचर बाईक आहे असून स्ट्रीट नेकेड बाईकचे व्हर्जन आहे. ही F77  प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, पण तिची चेसिस आणि सब-फ्रेम वेगळी आहे. बाईकला आकर्षक बीक-स्टाइल फेंडर, आकर्षक डिझाईनची टाकी आणि रेक्ड टेल सेक्शनसह कास्ट ॲल्युमिनियम सब-फ्रेम देण्यात आला आहे.
ही बाइक तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - Laser Red, Airstrike White आणि Shadow Black. या शिवाय Desert Wing वेरिएंटमध्ये मागील लगेज रॅक आणि सॉफ्ट/हार्ड पॅनियर्स दिले आहेत.
advertisement
फिचर्स काय ?
X47 Crossover चे सर्वात मोठे आकर्षण तिची रडार यंत्रणा आहे. ही बाइक ब्लाइंड स्पॉट पाहून लेन बदलण्यात मदत करते, तसंच ओव्हरटेक अलर्ट आणि मागून कुणी धडक मारणार असेल अलर्ट देते.  यासोबतच बाईकमध्ये डुअल इंटिग्रेटेड कॅमेरे देखील आहेत, जे dash-cam (डॅश-कॅम) चे काम करतात. तुम्ही हवे असल्यास डुअल डिस्प्ले पर्याय निवडू शकता, जे रिअल-टाईम पुढील आणि मागील कॅमेरा फीड दाखवतो.
advertisement
परफॉर्मन्स 
बाईकमध्ये इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 40bhp पॉवर आणि 100Nm पीक टॉर्क जनरेट करते. 0-60kmph ची स्पीड  2.7 सेकंडमध्ये पूर्ण होते आणि 0-100kmph चा स्पीड फक्त 8.1 सेकंदामध्ये पार करते.  या बाइकचा टॉप स्पीड 145kmph आहे. X47 Crossover मध्ये दोन बॅटरी पर्याय आहेत - 7.1kWh आणि 10.3kWh, जे अनुक्रमे 211km आणि 323km ची range रेंज देतात. बाईकसोबत इंटिग्रेटेड चार्जर देखील दिलं आहे.
advertisement
सेफ्टी आणि कंट्रोल फीचर्स
बाईकमध्ये तीन लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, ९ लेव्हल ब्रेक रीजेनरेशन, स्विचेबल डुअल-चॅनल एबीएस ABS आणि  कलर टीएफटी डिस्प्ले दिला आहे. हे फिचर सिटी रायडिंग पासून लांब adventure trips  ॲडव्हेंचर ट्रिप्सपर्यंत सुरक्षित आणि संतुलित रायडिंग देतं.
बुकिंग कधी?
Ultraviolette X47 Crossover ची बुकिंग सुरू झाली आहे. बाईकची डिलिव्हरी ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. बुकिंग करणाऱ्या सुरुवातीच्या 1,000 ग्राहक विशेष किंमतीचा लाभ घेऊ शकतात. या बाईकची किंमत 2.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. सुरुवातीच्या 1,000 ग्राहकांना ही बाइक फक्त 2.49 लाख रुपयांमध्ये  खरेदी करता येईल.
मराठी बातम्या/ऑटो/
Ultraviolette: फक्त 999 रुपयांमध्ये बूक करा सुपर EV Bike, रेंज 323 किमी, 0-100 फक्त 8 सेकंदात!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement