डॉ. अब्दुल कलाम यांनी केली होती या महिला शास्त्रज्ञाची निवड, कोण आहेत अग्निकन्या डॉ. टेसी थॉमस
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. घर आणि मुले सांभाळण्याची जबाबदारी आली. पण घरच्यांनी मला नेहमीच साथ दिली. मुलाची बोर्डाची परीक्षा आणि अग्नी प्रकल्प दोन्ही एकत्र आले. अशी अनेक आव्हाने आली.
राधिका कोडवानी, प्रतिनिधी
इंदूर : देशातील 'मिसाईल वुमन' अशी ओळख असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांचे नाव अनेकांनी ऐकले असेल. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढून क्षेपणास्त्र बनवण्याचा त्यांचा प्रवास फार कमी लोकांना माहीत असेल. मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कमाल यांच्याकडून प्रेरणा घेऊन 1988 मध्ये अग्नी मिसाइलच्या प्रोजेक्टमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. डॉ. टेसी थॉमस यांनी स्वत: आपला जीवन प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी त्या या पदावर कशा पोहोचल्या, हे सांगितले.
advertisement
FICCI फ्लो इंदूर चॅप्टरच्या कार्यक्रमात DRDO च्या माजी महासंचालक डॉ. टेसी थॉमस या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, अग्नी-2 आणि अग्नी-3 प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर त्यांना अग्नी-4 आणि अग्नी-5 या प्रोजेक्टचे संचालक बनवण्यात आले. डॉ. कलाम यांनी त्यांची नियुक्ती केली होती. दोन वर्षे इंटर्नशिप केल्यानंतर पुण्यातील इनर्शिअल नेव्हिगेशन ग्रुपमध्ये त्यांना शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी डीआरडीओसोबत काम केले. त्या काळात डॉ. कलाम अग्नी क्षेपणास्त्रावर काम करत होते.
advertisement
पुढे त्यांनी सांगितले की, माझी नियुक्ती स्वतः डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केली होती. डॉ. कलाम यांच्यासोबत काम करणे हा एक खास अनुभव होता. डॉ. कलाम हे कनिष्ठ-वरिष्ठ नव्हे तर प्रतिभा आणि समर्पण पाहत होते. या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा डॉ.कलाम यांच्याकडून मिळाली. मी त्यांना प्रेरणा आणि गुरू मानते. या प्रकल्पानंतर मला ‘अग्नीपुत्री’ आणि ‘मिसाईल वुमन’ असे संबोधले जाऊ लागले, असेही त्या म्हणाल्या.
advertisement
माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. घर आणि मुले सांभाळण्याची जबाबदारी आली. पण घरच्यांनी मला नेहमीच साथ दिली. मुलाची बोर्डाची परीक्षा आणि अग्नी प्रकल्प दोन्ही एकत्र आले. अशी अनेक आव्हाने आली. पण स्त्री आयुष्यातील कोणताही टप्पा गाठू शकते, फक्त तिला योग्य वेळी योग्य साथ मिळाली तर प्रवास सुकर होतो. प्रत्येक संघर्षात महिलांना साथ देणे हे पुरुषांचे कर्तव्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
advertisement
शिक्षणासाठी घ्यावं लागलं कर्ज -
डॉ. टेसी यांनी सांगितले की, अडचणीशी माझे जुने नाते आहे. मी 13 वर्षांची असताना माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांना अर्धांगवायू झाला. त्यामुळे आम्हा सहा भावंडांची जबाबदारी माझ्या आईवर होती. कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही, हे मी माझ्या आईकडून शिकलो. दहावीनंतर गणित आणि भौतिकशास्त्र निवडले. त्यानंतर विज्ञान शाखेत करिअर केले. अभ्यासासाठी कर्जही घ्यावे लागले. यानंतर इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये गाइडेड मिसाईल्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. हा मार्ग सोपा नव्हता, पण मी हिंमत ठेवली आणि माझे स्वप्न पूर्ण केले, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
advertisement
यशाचा मंत्र -
view commentsआत्मविश्वास, समर्पण आणि मेहनत हे यशाचे एकच सूत्र आहे. जर तुम्ही काही करण्याचा निश्चय केलात तर समजून घ्या की, तुम्ही यशाच्या मार्गावर आहात. माझे लक्ष नेहमी माझ्या कामावर असायचे. त्यांनी सांगितले की, त्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होत्या, तेव्हा त्यांच्यासमोर 200 शास्त्रज्ञ होते. प्रश्नोत्तराच्या सत्रात सकाळ कधी संध्याकाळ झाली ते कळलेच नाही. तसेच जेव्हा त्यांची बदली दिल्लीत होणार होती, पण संस्थेला माझी गरज होती, त्यामुळे अखेरच्या क्षणी बदलीही थांबवण्यात आली, हा किस्साही त्यांनी शेअर केला.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
February 17, 2024 4:52 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
डॉ. अब्दुल कलाम यांनी केली होती या महिला शास्त्रज्ञाची निवड, कोण आहेत अग्निकन्या डॉ. टेसी थॉमस


