शिक्षणानंतर नोकरी नाही, तरी गडी म्हणाला नो टेन्शन! आज कमावतोय लाखो रुपये, वाचा, तरुणाच्या कामाची गोष्ट
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कमी खर्चात कमाईचे हे एक उत्तम साधन बनत आहे. ग्रामीण भागाचा विचार केला असता, याठिकाणी कुक्कुटपालनाचा कल सातत्याने वाढत आहे.
राजकुमार सिंह, प्रतिनिधी
वैशाली : शिक्षणानंतर काही जणांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे काही जण निराश होतात. तर काही जण व्यवसायाकडे वळतात. आज अशाच एका तरुणाची कहाणी जाणून घेऊयात, ज्यालाही शिक्षणानंतर नोकरी मिळाली नाही. पण नंतर जे तरुणाने केले, त्यातून हा तरुण आज लाखो रुपयांची कमाई करत आहे.
रमेश कुमार राय या तरुणाची ही कहाणी आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कमी खर्चात कमाईचे हे एक उत्तम साधन बनत आहे. ग्रामीण भागाचा विचार केला असता, याठिकाणी कुक्कुटपालनाचा कल सातत्याने वाढत आहे. बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कुक्कुटपालन हा एक उत्कृष्ट व्यवसाय असल्याचे सिद्ध होत आहे. बेरोजगार तरुण याच्या मदतीने रोजगाराच मिळण्यासोबतच तरुणाई रोजगार निर्मातेही होत आहेत.
advertisement
रमेश कुमार राय यानेही असेच काहीसे केले आहे. रमेश कुमार राय वैशाली जिल्ह्यातील मालीपूर गावातील रहिवासी आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रमेशने रोजगाराच्या शोधात अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, त्याला यश न मिळाल्याने त्याने कुक्कुटपालन सुरू केले आणि आता त्याची चांगली कमाई होत आहे.
रमेशने सांगितले की, सुरुवातीला त्याने 1000 क्षमतेचा पोल्ट्री फार्म उघडला होता. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यावर क्षमता वाढवून 10 हजार करण्यात आली. कोंबडीचा आकार 30 दिवसांत एक किलो होतो. त्यानंतर तिला बाजारात विकले जाते. एक कोंबडी तयार करण्यासाठी 105 रुपये खर्च येतो. कुक्कुटपालन करताना थंडी आणि उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
6 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई -
view commentsतसेच तो पुढे म्हणाला की, मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन करणे एका व्यक्तीला शक्य नाही. त्यामुळे याठिकाणी 10 हजार कोंबड्यांची देखभाल करण्यासाठी चार जणाना ठेवण्यात आले आहे. कोंबड्यांना वेळेवर अन्न, पाणी आणि औषध देणे हे त्यांचे काम आहे. एक कोंबडी तयार करून विकल्यानंतर 10 रुपये नफा मिळतो. कोंबड्या तयार झाल्यानंतर लगेच व्यापारी येऊन त्यांचे वजन करून घेऊन जातात. तो त्याच्या फार्ममधून दरवर्षी 6 टन कोंबड्या काढतो. या माध्यमातून त्याची वर्षाला होते, असे त्याने सांगितले.
Location :
Vaishali,Bihar
First Published :
February 18, 2024 1:48 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
शिक्षणानंतर नोकरी नाही, तरी गडी म्हणाला नो टेन्शन! आज कमावतोय लाखो रुपये, वाचा, तरुणाच्या कामाची गोष्ट


