Mumbai Customs Recruitment 2024 : 10 वी पासवर 'मुंबई कस्टम्स'मध्ये नोकरीची संधी; 60 हजारांपर्यंत पगार

Last Updated:

Mumbai Customs Recruitment 2024: शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. अर्जासाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. वेतनमान : रु.19,000/- ते रु.63,200/- असणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.

News18
News18
मुंबई : येथील मुंबई कस्टम्स (Mumbai Customs) विभागाअंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीनं अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा.
कर्मचारी कार चालक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पद संख्या 28 आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता : 1) इयत्ता 10 वी पास. 2) मोटार कारचा ड्रायव्हिंग परवाना 3) मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. यासाठी वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे इतकी आहे. अर्जासाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. वेतनमान : रु.19,000/- ते रु.63,200/- असणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
advertisement
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन स्वरुपाची आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001.
advertisement
महत्वाच्या सूचना :
भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Mumbai Customs Recruitment 2024 : 10 वी पासवर 'मुंबई कस्टम्स'मध्ये नोकरीची संधी; 60 हजारांपर्यंत पगार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement