Career - कमीत कमी पैशांत हा कोर्स करा आणि थेट ‘नासा’मध्ये जॉब मिळवा

Last Updated:

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचं इंजिनीअर किंवा डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं; पण स्पर्धेच्या काळात अशा अनेक इंजिनीअरिंगच्या शाखा समोर आल्या आहेत, जे इंजिनीअरिंग केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नोकऱ्या मिळू शकतात.

नासा
नासा
नवी दिल्ली : बारावी सायन्सनंतर अनेकांना इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचं असतं. त्यानुसार आयटी, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा विविध इंजिनीअरिंग शाखांना विद्यार्थी प्राधान्य देतात; पण तुम्हाला माहिती आहे का, की इंजिनीअरिंगची एक अशी शाखा आहे, जिथे प्रवेश घेतल्यास तुमचं भवितव्य इतर क्षेत्रांतल्या इंजिनीअर्सपेक्षा चांगलं होऊ शकेल. ती शाखा म्हणजे एरॉनॉटिकल इंजिनीअर. हे इंजिनीअरिंग केल्यानंतर तुम्हाला ‘नासा’मध्येही नोकरी मिळू शकते.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचं इंजिनीअर किंवा डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं; पण स्पर्धेच्या काळात अशा अनेक इंजिनीअरिंगच्या शाखा समोर आल्या आहेत, जे इंजिनीअरिंग केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नोकऱ्या मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला इंजिनीअरिंगच्या अशाच एका शाखेबद्दल सांगणार आहोत, ज्या शाखेत शिकल्यानंतर तुम्हाला 'नासा'मध्येही नोकरी मिळू शकते. ती शाखा म्हणजे एरॉनॉटिकल इंजिनीअरिंग.
advertisement
नेमकं काम काय?
एरॉनॉटिकल इंजिनीअर विमान, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रं, ड्रोन आणि अंतराळयान यांसारख्या विमानांचं डिझाइन, विकास आणि परीक्षण करतात. हे इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर संरक्षण विभाग, विमान वाहतूक, भारतीय हवाई दल, नौदल, इस्रो, नासा, अंतराळ संशोधन आणि विकास केंद्र इत्यादींमध्ये नोकरी मिळू शकते.
advertisement
सर्वोत्कृष्ट कॉलेजं कोणती?
तुम्हीही एरॉनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल; पण तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या फीची काळजी वाटत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही सर्वोत्कृष्ट कॉलेजांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुमच्या कुवतीनुसार आणि आवडीनुसार तुम्हाला शिक्षण घेता येईल. चला तर, भारतात एरॉनॉटिकल इंजिनीअरिंगसाठी कोणती कॉलेज सर्वोत्कृष्ट आहेत, ते जाणून घेऊ.
या कॉलेजांमध्ये घेऊ शकता प्रवेश
एरॉनॉटिकल इंजिनीअरिंगसाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. इथून तुम्ही बीटेक पदवी मिळवू शकता. याशिवाय इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली प्लेसमेंट व पॅकेज मिळते. या कॉलेजची फी सर्वांत कमी आहे. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधूनदेखील विद्यार्थ्यांना एरॉनॉटिकल इंजिनीअरिंग करता येईल. त्याचबरोबर हिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स बेंगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर इथूनही विद्यार्थी एरॉनॉटिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेऊ शकतात. या सर्व कॉलेजांचं शुल्क वेगवेगळं असून, ते सुमारे 50 हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत आहे, असं वृत्त एबीपीनं दिलं आहे.
advertisement
दरम्यान, या कोर्सच्या अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी कॉलेजशी संपर्क साधू शकतात किंवा कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Career - कमीत कमी पैशांत हा कोर्स करा आणि थेट ‘नासा’मध्ये जॉब मिळवा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement