Success Story: वडिलाचं स्वप्न साकार केलं, दुष्काळी शेतकऱ्याचा लेक आरोग्य अधिकारी, कसं मिळालं यश?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Success Story: सोलापूरच्या दुष्काळी गावातील शेतकऱ्याच्या मुलाने घवघवीत यश संपादन केलंय. स्वप्नीलने सरळसेवेतून आरोग्य अधिकारी होत वडिलांचं स्वप्न साकार केलंय.
सोलापूर: दुष्काळी जिल्हा म्हणूनच सोलापूरला ओळखलं जातं. त्यामुळे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याकडे इथल्या विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. नुकतेच मोहोळ तालुक्यातील हराळवाडीच्या एका तरुणाने सरळ सेवेतून घवघवीत यश संपादित केलंय. एका शेतकरी पुत्राची थेट आरोग्य निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. स्वप्नील मिनू पाटील असे या शेतकरीपुत्राचे नाव असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
स्वप्नील पाटील हा मुळचा मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हराळवाडी या गावातील आहे. पिढीजात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नील याने अधिकारी व्हावं असं वडिलांचं स्वप्न होतं. मुलाने हे स्वप्न सत्यात उतरवलं असून त्याची सरळ सेवेतून आरोग्य निरीक्षकपदी निवड झालीये. स्वप्नीलचं शिक्षण हराळवाडीतील जिल्हा परिषद शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण कोरवली येथे तर पदवीचे शिक्षण सोलापुरातील दयानंद कॉलेजमध्ये झाले आहे.
advertisement
स्वप्नील सागंतो की, “कॉलेजमध्ये असताना स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. वडील शेतकरी असून त्यांचं मुलानं अधिकारी व्हावं हे स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2023 मध्ये सोलापूर जिल्हा परिषद येथे सरळ सेवा भरतीचा फॉर्म भरला होता. त्याची परीक्षा झाली आणि नुकतेच या सरळ सेवा भरतीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद येथे आरोग्य निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.”
advertisement
आता थांबायचं नाही!
आरोग्य निरीक्षक म्हणून निवड झाली असली तरी स्वप्नीलला इथंच थांबायचं नाही. त्याने राज्यसेवेच्या परीक्षेची देखील तयारी सुरू केली आहे. घरच्यांची मदत आणि वडिलांची साथ मिळाल्यामुळे मला हे यश संपादन करता आलं. घरच्यांनी साथ दिली नसती तर मी देखील एक शेतकरीच बनलो असतो. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करत राहावे. एके दिवशी यश नक्कीच मिळेल, असे आवाहन स्वप्नीलने केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 25, 2025 9:03 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story: वडिलाचं स्वप्न साकार केलं, दुष्काळी शेतकऱ्याचा लेक आरोग्य अधिकारी, कसं मिळालं यश?