उच्च शिक्षणासाठी शहरात राहायचंय? 'स्वाधार' देईल आधार, अर्ज केला तरच मिळणार लाभ!
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मागास वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत वसतिगृहांची सोय करण्यात आलीय. मात्र, ज्यांना वसतिगृहांत प्रवेश मिळत नाही अशांसाठी स्वाधार योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.
जालना: गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मागास वर्गातील विद्यार्थ्यांना तर बऱ्याचदा शिक्षण घेणं अशक्य होतं. अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने वसतीगृह सुविधा दिली आहे. मात्र सर्वांनाच वसतीगृहात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंडेकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता अर्ज करणे गरजेचे आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत 100 मुलांचे व 100 मुलींची क्षमता असलेल्या 72 वसतीगृहांस मंजुरी दिली आहे. या वसतीगृहांत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, भोजन भत्ता दिला जातो. मात्र ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांना स्वाधार योजनेतून आधार दिला जातोय.
advertisement
व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुदत
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अधिक अवधी मिळाला असून लवकरात लवकर अर्ज करण्याची गरज आहे.
वसतिगृहासाठी अर्ज बंधनकारक
स्वाधार योजनेच्या नियमावलीत या वर्षापासून बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वाधारचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे बंधन कारक करण्यात आले आहे. त्याशिवाय स्वाधारचा आधार मिळणार नाही, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी दिली.
advertisement
असा करा अर्ज
view commentsपूर्वी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात अर्ज करणे अनिवार्य नव्हते. अर्ज न करताही स्वाधार योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र, या वर्षापासून या नियमांत बदल करण्यात आले आहेत. आता वसतिगृहासाठी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षापासून शासनाने https://hmas.mahait.org/ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. याच महाआयटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 17, 2024 9:58 AM IST


