UPSC Recruitment 2025: तयारीला लागा रे! UPSC द्वारे 111 पदांची बंपर भरती, लगेच अर्ज करा

Last Updated:

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 सालासाठी एकूण 111 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.

upsc
upsc
UPSC Recruitment 2025: जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 सालासाठी एकूण 111 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षेसाठी उमेदवार 1 मे पासून अर्ज करू शकतात. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in. यावर जाऊन उमेदवारांनी अर्ज करावा.तर प्रिंट काढण्याची शेवटची तारीख 2 मे 2025 आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सहाय्यक सरकारी वकील आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये असिस्टंट पब्लिक प्रोसिक्यूटर, डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव, सिस्टम अॅनालिस्ट आणि असिस्टंट इंजिनिअर या पदांचा समावेश आहे.

कोणत्या पदासाठी जागा? 

  • असिस्टंट पब्लिक प्रोसिक्यूटर - ६६ पदे
  • डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव - १८ पदे
  • जॉइंट असिस्टंत डायरेक्टर- १३ पदे
  • सिस्टम अॅनालिस्ट - १ पद
  • असिस्टंच लेजिस्लेटिव काउंसल - ४ पदे
  • असिस्टंट इंजिनिअर - ९ पदे
advertisement

परीक्षा अर्ज शुल्क

परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. तसेच महिला, एसटी आणि PwBD कॅटगरीच्या उमेदवरांना अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच इच्छुक उमेदवार शुल्क ऑनलाईन नेट बँकिंग, डेबिट कार्ड, यूपीआयद्वारे देखील भरू शकतात,

परीक्षेसाठी अर्ज कसा करावा?

  • इच्छुक उमेदवारांना upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • होमपेजवर 'UPSC भरती 2025' लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी करा आणि नंतर लॉगिन करा.
  • अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • फी भरा आणि अर्ज सादर करा.
  • फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/करिअर/
UPSC Recruitment 2025: तयारीला लागा रे! UPSC द्वारे 111 पदांची बंपर भरती, लगेच अर्ज करा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement