exam time : मुलांच्या परिक्षेबाबत तणावात असाल, तर ही बातमी नक्की वाचा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या परीक्षेची वेळ सुरू आहे. यावेळी मुलांच्या कुटुबीयांना ही बाब लक्षात घ्यावी लागेल की, आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नका.
रुपांशु चौधरी, प्रतिनिधी
हजारीबाग : फेब्रुवारी, मार्च हे परीक्षांचे महिने आहेत. या महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. अशा परिस्थितीत मुलांच्या पालकांना नेहमी परीक्षा आणि निकालाबाबत चिंता असते. तसेच मुलांच्या अभ्यासाबाबतही त्यांना चिंता असते. त्यामुळे अनेकदा मुलांचेसुद्धा मन अभ्यासापासून विचलित होऊ लागते. अशा परिस्थितीत ज्योतिषांनी काही उपाय सांगितले आहे. हे उपाय केल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेत चांगले अंक मिळवून देण्यासाठी खूप मदत करतात.
advertisement
हजारीबाग येथील मां पीतांबरा ज्योतिष केंद्राचे ज्योतिषी अशेष समर पाठक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या परीक्षेची वेळ सुरू आहे. यावेळी मुलांच्या कुटुबीयांना ही बाब लक्षात घ्यावी लागेल की, आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नका. जर मुलांच्या नशिबात आणि त्यांच्या मनात काही वेगळे असेल तर ते त्यांना करू द्यावे. सोबतच हासुद्धा प्रयत्न करावा की कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका. याशिवाय अनेक वेळा मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात. त्यासाठी हे उपाय घरीच करता येतात.
advertisement
या टिप्स फॉलो करा -
अभ्यास करताना मुलांनी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करावे. पूर्वेकडे तोंड करून अभ्यास केल्याने, सूर्याची सकारात्मक ऊर्जा मुलांमध्ये प्रवेश करते. तसेच जे त्यांना वाचलेले आहे ते लक्षात ठेवण्यास मदत करते. उत्तरेकडे तोंड करून अभ्यास केल्याने मुलांच्या मनाची एकाग्रता वाढते. घरामध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी त्यांची अभ्यासाची खोली ईशान्य कोपऱ्यात असणे फायदेशीर मानले जाते.
advertisement
भारतातील दुसरा सर्वात मोठा राजमहाल, राजा-राणीसारखं आयुष्याची येईल अनुभूती, भाडं किती?, photos
तसेच अभ्यास करताना तुमची पाठ दाराकडे ठेवावी, असे केल्याने तुमची स्मरणशक्ती कमी होते. यासोबतच अभ्यास करताना पाठीमागे भिंतीसारखी भक्कम वस्तू असणे फायदेशीर ठरते, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.
सूचना - ही बातमी ज्योतिषांनी दिलेल्या संवादावर आधारित आहे. न्यूज18 लोकल याबाबत कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Hazaribagh,Jharkhand
First Published :
February 09, 2024 4:00 PM IST


