ShivShankar: शंभू महादेवाच्या मस्तकावर चंद्र का? जाणून घ्या डाव्याच बाजूला चंद्र असण्याचं रहस्य

Last Updated:

Moon On Shiva head: शिवाचे उग्र रूप जर चंद्राच्या शीतलतेने संतुलित झाले नसते, तर त्यांचे तेज अमर्याद झाले असते. यामुळे चंद्र त्यांच्या मस्तकावर विराजमान आहे - जेणेकरून उग्रता आणि शांती या दोन्हींचा समन्वय साधला जाईल. बोध आपल्यालाही शिकवते की जीवनात कठोरता आणि करुणा, या दोन्हींचा मेळ आवश्यक आहे. 

News18
News18
मुंबई : शंकराचे स्वरूप जितके रहस्यमय आहे, तितकेच गूढ ज्ञान त्यात दडलेलं आहे. महादेवाच्या शरीराचे प्रत्येक प्रतीक काही ना काही संदेश देते - मग तो गळ्यातील नाग असो, कपाळावरील तिसरा नेत्र, शरीरावर लावलेली भस्म किंवा डोक्यावरील जटांमध्ये वाहणारी गंगा असो. पण या सर्वांमध्ये आणखी एक रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे - शंकराच्या कपाळावर डाव्या बाजूला विराजमान असलेला चंद्र. महादेवानं आपल्या डोक्यावर चंद्राला का धारण केलंय? आणि तोही फक्त डाव्या बाजूलाच का?
अनेक लोक याला केवळ एक अलंकार मानतात, पण प्रत्यक्षात यामागं एक खोल अर्थ आणि पौराणिक कथा आहे. चंद्र केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही, तर तो मानसिक शांती, संतुलन आणि भावनिक ऊर्जेचाही द्योतक आहे. शिव जे संहारक आहेत, जे तांडव करतात, जे विष धारण करतात - त्यांना चंद्राच्या शीतलतेची गरज होती. याच कारणामुळे चंद्राला त्यांच्या मस्तकावर स्थान मिळालं. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून यामागची कथा आणि रहस्य सविस्तरपणे समजून घेऊया.
advertisement
समुद्र मंथनाची कथा - पुराणांनुसार, जेव्हा देवता आणि दानवांनी समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून विष (हलाहल) बाहेर पडलं. त्या विषापासून सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शिवाने ते आपल्या कंठात धारण केले, ज्यामुळे त्यांना नीलकंठ म्हटले गेले. परंतु त्या विषाची उष्णता इतकी तीव्र होती की देवांना चिंता वाटली की महादेव यांचे शरीर जळून तर जाणार नाही. तेव्हा चंद्रदेव पुढे आले आणि त्यांनी आपल्या शीतल तेजाने त्या विषाची उष्णता शांत केली. शिवजींनी प्रसन्न होऊन त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिलं. तेव्हापासून चंद्र भगवान शिवाच्या डोक्यावर कायमस्वरूपी विराजमान झाले. म्हणूनच शिवाला "चंद्रशेखर" असंही म्हटलं जातं.
advertisement
चंद्र आणि भगवान शिवाचे गहन नातं - ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन आणि भावनांचा कारक मानलं गेलं आहे. तो शांती, सौम्यता आणि संतुलनाचे प्रतीक आहे. तर भगवान शिव तप, वैराग्य आणि संहाराचे प्रतीक आहेत. जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र येतात, तेव्हा जीवनात संतुलन निर्माण होते.
शिवाचे उग्र रूप जर चंद्राच्या शीतलतेने संतुलित झाले नसते, तर त्यांचे तेज अमर्याद झाले असते. याच कारणामुळे चंद्र त्यांच्या मस्तकावर विराजमान आहे - जेणेकरून उग्रता आणि शांती या दोन्हींचा समन्वय साधला जाईल. हे आपल्यालाही शिकवते की जीवनात कठोरता आणि करुणा, या दोन्हींचा मेळ आवश्यक आहे.
advertisement
शिवाने चंद्राला मस्तकावर डाव्या बाजूलाच का ठेवलंय - ज्योतिष आणि योगशास्त्रानुसार, शरीरात दोन प्रमुख नाड्या (नर्व्ह) असतात - पिंगला आणि इडा. उजव्या बाजूची नाडी पिंगला नाडी म्हणून ओळखली जाते, जी सूर्य आणि पुरुष तत्वाचे प्रतिनिधित्व करते. तर डाव्या बाजूची इडा नाडी चंद्र तत्व आणि स्त्री शक्तीचे प्रतीक मानली जाते. भगवान शिवाच्या मस्तकाच्या डाव्या बाजूला चंद्र असणे हे याच गोष्टीचे संकेत आहे की चंद्र स्त्री ऊर्जा, भावना आणि शांतीचे प्रतिनिधित्व करतात. शिवामध्येही हे संतुलन आवश्यक होते - एकीकडे त्यांचे उग्र रूप आणि दुसरीकडे चंद्राची शीतलता.
advertisement
चंद्र आणि माता पार्वतीचा संबंध - पौराणिक मान्यतेनुसार, चंद्र माता पार्वतीचे देखील प्रतीक आहेत. शिवाच्या डाव्या बाजूला पार्वतीचा वास आहे, ज्यांना शक्तीचे रूप मानले जाते. जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र असतात, तेव्हा त्यांना अर्धनारीश्वर म्हटलं जातं.
देवी पार्वती शिवाच्या डाव्या बाजूला विराजमान असल्यामुळे, चंद्राचे त्याच बाजूला असणे स्वाभाविक आहे. त्याचा अर्थ शिव आणि शक्ती वेगळे नाहीत, तर ते एकमेकांचे पूरक आहेत - जसे उग्रता आणि कोमलता, वैराग्य आणि प्रेम, तपस्या आणि करुणा.
advertisement
आध्यात्मिक संदेश - भगवान शिवाच्या मस्तकावर विराजमान चंद्र आपल्याला हे शिकवतो की जीवनात संतुलन खूप आवश्यक आहे. केवळ तपस्या किंवा केवळ भावना - हे दोन्ही अतिरेक आहेत, जर जीवनात शिवाप्रमाणे दृढता ठेवायची असेल, तर चंद्राप्रमाणे शांती देखील अंगीकारावी लागेल. हाच शिवाच्या चंद्रशेखर रूपाचा गूढ संदेश आहे - जीवनात उग्रतेसोबत विनम्रता आणि दृढतेसोबत संवेदनशीलता आवश्यक आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
ShivShankar: शंभू महादेवाच्या मस्तकावर चंद्र का? जाणून घ्या डाव्याच बाजूला चंद्र असण्याचं रहस्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement