Central Railway: दिवाळीची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेची मोठी घोषणा, धावणार 18 विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक

Last Updated:

या विशेष गाड्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात धावणार असून प्रवाशांना सुट्टीच्या हंगामात अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

दिवाळी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेची मोठी घोषणा – मुंबई, पुणे ते नागपूरदरम्यान १८ विशेष गाड्या
दिवाळी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेची मोठी घोषणा – मुंबई, पुणे ते नागपूरदरम्यान १८ विशेष गाड्या
मुंबई: प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दिवाळीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेद्वारे मुंबई–नागपूर आणि पुणे–नागपूर या मार्गांदरम्यान एकूण 18 अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात धावणार असून, प्रवाशांना सुट्टीच्या हंगामात अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मुंबई–नागपूर विशेष सेवा (6 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 26, 28 आणि 30 ऑक्टोबर रोजी रात्री 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 16.05 वाजता नागपूरला पोहोचेल. त्याची परतीची गाडी क्रमांक 01012 नागपूरहून 26, 28 आणि 30 ऑक्टोबर रोजी रात्री 22.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 14.05 वाजता मुंबईत पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा आदी स्थानकांवर थांबे असतील.
advertisement
पुणे–नागपूर विशेष सेवा (12 फेऱ्या)
पुण्याहून नागपूरकडे दोन विशेष जोड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक 01409- 25, 27, 29 आणि गाडी क्रमांक 01410- 26, 28, 30 ऑक्टोबर रोजी धावतील. तसेच गाडी क्रमांक 01401 26, 28, 30 आणि गाडी क्रमांक 01402- 27, 29, 31 ऑक्टोबर रोजी सुटतील. पुण्याहून या गाड्या रात्री 20.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 14.05 वाजता नागपूरला पोहोचतील तर नागपूरहून सुटणाऱ्या गाड्या संध्याकाळी 16.10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता पुण्यात पोहोचतील.
advertisement
या गाड्यांना दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, वर्धा आदी प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. विविध श्रेणींतील वातानुकूलित आणि शयनयान कोचेससह प्रवाशांना आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण www.irctc.co.in या संकेतस्थळावर तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू आहे. तपशीलवार वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES App वापरावा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: दिवाळीची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेची मोठी घोषणा, धावणार 18 विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement