'मी रडलो की पगार वाढतो', कुक दिलीपचा शॉकिंग खुलासा, केली फराह खानची पोलखोल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Farah Khan : फराह खानचा कुक दिलीपचा पगार फराहने वाढला आहे. पगार वाढवण्यामागचं कारणही दिलीपने सांगितलं. हे ऐकून चाहते शॉक झालेत.
प्रसिद्ध फिल्ममेकर फराह खान आपल्या फिल्म आणि डान्स सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलवरुन चाहत्यांशी कनेक्ट असते. तिने आपल्या किचन मध्ये काम करणाऱ्या दिलीप सोबत अनेक व्हिडिओ मधून दिसते. हल्लीच दिलीपने एक आनंदाची बातमी सांगितली आहे. फराहच्या व्लॉगमधून दिलीपला एक ओळख मिळाली आहे. तो एका व्हिडिओ मधून आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
एका व्लॉगमध्ये फराह आणि दिलीप राघव जुयालच्या घरी जाताना दिसले. त्यांनी त्याच्या घरी जाऊन दुपारचे जेवण केले. तेव्हाच ती आनंदाची बातमी दिलीपने सांगितली. दिलीप म्हणाला, "आमचा शो खूप छान चालत आहे. मॅमने माझा पगारही वाढवला आहे. मी खूप आनंदी आहे. तुम्ही लोकं मॅमला सांगू नका.आता मी रडलो तर पगार अजून वाढेल." ही दिलीपची व्हिडिओ खूप वायरल झाली होती.
advertisement
दोघांचे नाते चांगले आहे
त्यानंतर फराह आणि दिलीपची बाँडिंग चांगला असलेली पाहायला मिळते. जेव्हा फराह किचन मधून बाहेर आली, तेव्हा दिलीप उदास ऊभा होता.vफराह म्हणाली, "तुला काय झाले, तू का रडतो आहेस ?" दिलीप हसून म्हणाला, "मॅम माझा पगार वाढवा". फराह लगेच म्हणाली की, "आत्ताच वाढवला आहे, सोड हा माणूस कधी आनंदी नसतो."
advertisement
25 लाख सबस्क्राइबर
view commentsफराह खानच्या यूट्यूब चॅनलचे 25 लाख सबस्क्राइबर झाले आहेत. एवढंच नाही तर त्यांचे व्लॉग हे 15 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहेत. त्यात राघवनेही दिलीपचं कौतूक करत त्याला व्हिडिओमध्ये स्टार म्हटले आहे. दिलीपचा साधेपणा आणि गंमती यांमुळे त्या दोघांचे नाते प्रेक्षकांना आवडते. फराह सोबत दिलीपने अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सच्या घरी पाहुणचार केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 3:16 PM IST


