पुन्हा झपाट्याने का वाढत आहेत कोरोना रुग्ण; आरोग्यमंत्र्यांनी दिलं कारण, JN.1 बाबत धक्कादायक खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
देशातील एकूण सक्रिय कोविड प्रकरणांपैकी 80% पेक्षा जास्त प्रकरणे केरळमध्ये आहेत.
नवी दिल्ली, 23 डिसेंबर : कोरोनातून सुटका झालेली असताना कोरोना आता पुन्हा विळखा घालू लागला आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे रुग्ण मोठ्या संख्येने सापडून येत आहेत. केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. यामागे नेमकं कारण काय आहे, हे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबतही त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, केरळमध्ये 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 265 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. त्याचवेळी एका रुग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,606 झाली आहे. सध्या, देशातील एकूण सक्रिय कोविड प्रकरणांपैकी 80% पेक्षा जास्त प्रकरणे केरळमध्ये आहेत.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी सांगितलं की, "नोव्हेंबरपासून राज्यात कोविड प्रकरणांमध्ये किंचित वाढ होत आहे. कारण इथं चाचणी केलेल्या नमुन्यांची संख्या इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. 1 नोव्हेंबरपासून आम्ही नमुने पाठवत आहोत. आमची चाचणी संख्या जास्त आहे त्यामुळे साहजिकच, आम्हाला अधिक सकारात्मक प्रकरणे येत आहेत"
advertisement
नवीन JN.1 प्रकाराबद्दलची भीती दूर करत त्या म्हणाल्या, "नोव्हेंबरमध्ये आम्ही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुना पाठवला होता. 18 नोव्हेंबर रोजी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या 79 वर्षीय महिलेचा नमुना JN.1 ची लागण झाल्याचंआढळून आले. ती घरी क्वारंटाईनमध्ये होती आणि आता ठीक आहे. तथापि, आयसीयूमध्ये दाखल रुग्ण, व्हेंटिलेटर किंवा आयसोलेशन बेडवर असलेल्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेकांना गंभीर आजार होते; एका व्यक्तीला कॅन्सर होता आणि दुसऱ्या रुग्णाला किडनी आणि हृदयविकाराचा तीव्र आजार होता. कोणालाही कोविडशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती"
advertisement
वीणा जॉर्ज म्हणाल्या, "आम्हाला आणखी प्रकरणांची अपेक्षा करावी लागेल कारण सिंगापूर विमानतळावर केलेल्या निगराणीवरून असं दिसून आलं आहे की भारतातील 19 प्रवासी, केवळ केरळमधीलच नव्हे तर विविध भागांतील, JN.1 ची लागण जाली आहे. आमच्याकडे A, B, C योजना तयार आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही. या प्रकाराची संसर्गजन्यता जास्त आहे, परंतु तीव्रता कमी आहे"
Location :
Delhi
First Published :
December 23, 2023 11:17 PM IST
मराठी बातम्या/कोरोना/
पुन्हा झपाट्याने का वाढत आहेत कोरोना रुग्ण; आरोग्यमंत्र्यांनी दिलं कारण, JN.1 बाबत धक्कादायक खुलासा