लग्नसोहळ्यात नाचताना वाद, निर्जन ठिकाणी बोलवून चाकूने सपासप वार; मृतदेहाचे पाहा काय केले
- Published by:Jaykrishna Nair
- press trust of india
Last Updated:
Crime News: ठाणे जिल्ह्यातील शाहपूर येथे लग्नसोहळ्यातील वादातून 21 वर्षीय युवकाची याची हत्या झाली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ठाणे: जिल्ह्यातील शाहपूर येथे एका लग्नसोहळ्यात सुरू झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचला. बालू वाघ (२१) या युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह भातसा नदीत फेकण्यात आला. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी कजगाव येथे एका लग्नसोहळ्यात ही धक्कादायक घटना घडली. लग्नाच्या स्वागत समारंभात नाचताना बालू वाघ आणि एका अल्पवयीन आरोपीमध्ये वाद झाला. नाचताना झालेल्या छोट्याशा वादाचे पर्यवसान मोठ्या भांडणात झाले. त्या अल्पवयीन मुलाने आपल्या दुसऱ्या मित्रासह मिळून बालू वाघला लग्नानंतर एका निर्जन ठिकाणी बोलावले. तिथेच चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह भातसा नदीत फेकून पळ काढला.
advertisement
लॅम्बोर्गिनीची 2 कामगारांना चिरडले; निर्ढावलेल्या चालकाने विचारले, कोणी मेला का?
भातसा नदीत २६ मार्च रोजी एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता, तो बालू वाघचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि लग्नसोहळ्यात झालेल्या वादाचा धागा उकलला. संशयितांवर संशय घेऊन चौकशी केली असता, दोन्ही अल्पवयीन मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
या हत्येप्रकरणी दोन्ही १७ वर्षीय आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना सध्या भिवंडीतील सुधारगृहात ठेवण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या हत्याकांडामुळे शाहपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एक छोटासा वाद थेट हत्येपर्यंत कसा गेला? यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांमध्ये वाढती हिंसा आणि समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 30, 2025 10:56 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नसोहळ्यात नाचताना वाद, निर्जन ठिकाणी बोलवून चाकूने सपासप वार; मृतदेहाचे पाहा काय केले